ETV Bharat / city

गुंड, बलात्काऱ्यांना सरकारकडून अभय, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्लाबोल - महिला सुरक्षा चित्रा वाघ नाशिक

राज्यात अपहरणाच्या घटना वाढत असून २५ हजार महिला, मुली गायब आहेत. महाराष्ट्रात नेमके चालले काय? भाजपच्या लोकांवर दणादण गुन्हे दाखल होतात, पण गुंडांवर - बलात्काऱ्यांसाठी आयपीसीचे कलम नाही का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ ( bjp leader chitra wagh comment on Maha vikas Aghadi government ) यांनी उपस्थित केला.

chitra wagh on state government
महिला सुरक्षा चित्रा वाघ नाशिक
author img

By

Published : Jan 10, 2022, 10:45 PM IST

नाशिक - राज्यात अपहरणाच्या घटना वाढत असून २५ हजार महिला, मुली गायब आहेत. महाराष्ट्रात नेमके चालले काय? भाजपच्या लोकांवर दणादण गुन्हे दाखल होतात, पण गुंडांवर - बलात्काऱ्यांसाठी आयपीसीचे कलम नाही का? असा सवाल उपस्थित करत गुंडांना, बलात्काऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडून ( bjp leader chitra wagh comment on Maha vikas Aghadi government ) अभय दिले जात असल्याचा आरोप भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.

माहिती देताना भाजप नेत्या चित्रा वाघ

हेही वाचा - Thief Return Stolen Loots : नाशिकमध्ये चोरलेला मुद्देमाल परत करत चोराचा माफीनामा, म्हणाला "सॉरी..."

सध्या सर्वच घटकांमध्ये अस्वस्थता, सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का?

वसंतस्मृती कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषदेत चित्रा वाघ या बोलत होत्या. आधी पोलीस आयुक्त गायब झाले, नंतर गृहमंत्री गायब झाले आणि मुख्यमंत्रीही गायब आहेत, असा टोला चित्रा वाघ यांनी सरकारला लगावला. नाशकात दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जाते, अपहरणाचा प्रयत्न होतो, जामिनावर अरोपी सुटतो, महिलेवर बलात्कार करतो, पण पोलीस यंत्रणा कुठे आहे? सध्या सर्वच घटकांमध्ये अस्वस्थता असून सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का? अशी शंका यावी अशी परिस्थिती असल्याची जोरदार टीका चित्रा वाघ यांनी केली. माझ्या राजकीय करिअरची कुणीही काळजी करू नये, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

आदिवासी महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

जिल्ह्यातील ५० टक्के आदिवासी बांधवाना खावटी योजनेचे अनुदान मिळालेले नाही. नंदुरबार जिल्ह्यातही आदिवासी बांधवांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. एकट्या नंदुरबा जिल्ह्यात ३१ मातांचा असुरक्षित बाळंतपणात बळी गेला. या बालमृत्यू, माता मृत्यूंची जबाबदारी कुणाची? असा जाब त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

हेही वाचा - No lockdown: जिल्हाधिकारी म्हणतात, लाॅकडाऊन झालेला नाही, अफवा पसरवू नका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.