नाशिक -लॉकडॉऊन काळात इंदिरानगर परिसरातील एका आश्रमशाळेतील सामाजिक कल्याणकारी कामाच्या नावाखाली तसेच स्वतः जवळील सोने यज्ञ व होम-हवन केल्याशिवाय कोणालाही विकता येणार नसल्याचे कारण सांगून वृद्धाला लोखो रुपयाचा लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदुबाबाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शिताफीने शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत गणेश जयराम जगताप असे भोंदूबाबाचे नाव आहे.
इंदिरानगर पोलिसांनी भोंदूला मुंबईतून केली अटक
इंदिरा नगर मध्ये आश्रम उभे करून आता आपल्याला मुलींसाठी वसतिगृह आणि दवाखाना बांधण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत तसेच त्याच पैशांच्या बदल्यात जमिनीतून सोने काढून देण्याचे आमिष दाखवत एका भोंदूबाबानं नाशिक शहरांमधील अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती सातपूर मधील एका व्यक्तीला या भोंदू बाबा जमिनीतून सोने काढून देण्याचे आमिष दाखवत जवळपास 11 लाख रुपयांची फसवणूक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांमध्ये या भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याने या भोंदूबाबाने सरकारी ऑफिसर सह अनेक नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती उघड होताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी या घटनेची गंभीऱ्यान दखल घेऊन या भोंदूबाबाचा शोध सुरू केला आणि जवळपास नऊ महिन्यांनंतर या भोंदूबाबाला बेड्या ठोकण्यात पोलिसांना अखेर यश आले.मुंबई मधील काशमीरा परिसरातून पोलिसानी या भोंदूला अटक केली असून या भोंदू बाबाने आणखी कोणाची अश्याप्रकारे फसवणूक केली असल्यास पोलिसात तक्रार दाखल करण्याच आवाहन पोलिसानी केलं आहे.
भोंदू बाबाच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झालेल्यांनी पुढे येण्याचं आवाहन -
पोलिसांनी या भोंदू गावाकडून जवळपास 40 कॉइन बोगस सोन्याची बिस्किटं आणि कोरे स्टॅम्प पेपर देखील हस्तगत केले आहेत या भोंदूबाबा विरोधात नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याने आतापर्यंत जवळपास 53 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे देखील पोलीस तपासामध्ये समोर आला आहे तसेच जमिनीतून अथवा विविध बहाण्याने सोने देण्याच्या आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठावे असा आवाहन गुन्हे शाखा आणि इंदिरानगर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.