ETV Bharat / city

नाशकतील नाव दरवाजा येथे घरफोडी करणाऱ्या 7 आरोपींना भद्रकाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

author img

By

Published : Jun 17, 2021, 1:20 PM IST

भद्रकाली भागातील कीर्तीकुमार औरंगाबादकर यांच्या घरी गेल्या आठवड्यात चोरी झाली. त्यांच्या घरातून 9 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. अखेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे चोरट्यांचा माग काढत 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. यात 2 अल्पवयीन मुलांचा ही सहभाग आहे. त्यांच्या कडून 5 लाख 19 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Bhadrakali police arrested 7 accused of burglary at nav Darwaza in Nashik
नाशकतील नाव दरवाजा येथे घरफोडी करणाऱ्या 7 आरोपींना भद्रकाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक - शहरातील भद्रकाली परिसरात झालेल्या घरफोडीतील आरोपींना अखेर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भद्रकाली परिसरातील नाव दरवाजा येथील कीर्तीकुमार औरंगाबादकर यांच्या जुन्या वाड्यातून सात दिवसांपूर्वी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा जवजवळ 9 लाख 81 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी मध्यरात्री लंपास केला होता.

नाशकतील नाव दरवाजा येथे घरफोडी करणाऱ्या 7 आरोपींना भद्रकाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

भद्रकाली भागातील कीर्तीकुमार औरंगाबादकर यांच्या घरी गेल्या आठवड्यात चोरी झाली. त्यांच्या घरातून 9 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यामुळे भद्रकाली पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान होते. अखेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे चोरट्यांचा माग काढत 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. यात 2 अल्पवयीन मुलांचा ही सहभाग आहे. त्यांच्या कडून 5 लाख 19 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात सोने चांदीच्या दागिन्यांसह, घरफोडी साठी वापरलेल्या गॅस कटरचाही समावेश आहे. भद्रकाली पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

चोरी करताना या आरोपींनी दोन अल्पवयीन बालकांना घेऊन पत्र्यावर जाऊन गँस कटरने पत्रे वाकवत घरामध्ये प्रवेश केला आणि घरामधील सोन्या चांदीचे दागिने तसेच इतर साहित्य चोरून नेले होते. या चोरी प्रकरणी आरोपींना 17 जूनपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा उर्वरित मुद्देमाल मिळवण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.