ETV Bharat / city

नाशिकमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित मिसळीवर मारला ताव - nashik misal

नाशिकच्या विकासासाठी व जनतेसाठी एकत्र यावे या हेतूने या पार्टीचे आयोजन केले होते.

नाशिकमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित मिसळीवर मारला ताव
author img

By

Published : May 3, 2019, 10:47 AM IST

नाशिक - निवडणुका म्हटलं की आरोप-प्रत्यारोप आलेच. मात्र, राजकारणात सर्व काही शक्‍य आहे असे म्हणत नाशिकमध्ये सर्वपक्षीय मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणुकीच्या प्रचाराचा राग विसरून सर्वच उमेदवार आणि पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत मिसळीचा आनंद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी या मिसळ पार्टीचे आयोजन केले होते.

नाशिकमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित मिसळीवर मारला ताव

प्रत्येक पक्षाच्या विचारधारेवर कार्यकर्ते आणि नेते निवडणुकीच्या कालावधीमध्ये काम करत असतात. त्यामुळे वैचारिक मतभेदामुळे अनेकवेळा एकमेकांमध्ये कटुता येते. ही कटुता जावी म्हणून या मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे रंजन ठाकरे यांनी सांगितले. यावेळी समीर भुजबळ म्हणाले, की निवडणुकीच्या कामकाजानंतर सर्वपक्षीय नेते मंडळींनी नाशिकच्या विकासासाठी व जनतेसाठी एकत्र यावे या हेतूने या पार्टीचे आयोजन केले होते. तर, ही कटुता राजकीय असते. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर हे सर्व विसरून समाजामध्ये चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

Intro:मिसळ गरम आहेत..चेहरे पन नरम आहेत..भाऊ रस्सां कमी वाढ वातावरण गरम आहे असे म्हणत सर्व पक्षीय पंदाधिकारी मिसळीवर ताव मारला..

Body:निवडणुका म्हटलं की आरोप-प्रत्यारोप आलेच मात्र सर्व काही शक्‍य असं म्हणत नाशिकमध्ये सर्वपक्षीय मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आलं होत .. यावेळी निवडणुकीच्या प्रचाराचा राग विसरून सर्वच उमेदवारांनी आणि पक्षांच्या नेत्यांनी एकत्र मिसळीचा आनंद घेतलाय...

Conclusion:प्रत्येक पक्षाच्या विचारधारेवर कार्यकर्ते आणि नेते निवडणुकीचा कालावधी मध्ये काम करत असतात काम करत असताना कटूता येते आणि ती कटुता जावी म्हणून या मिसळ पार्टीचे आयोजन केलं असल्याचं रंजन ठाकरे राष्ट्रवादी शहराध्यक्ष यांनी सांगितले यावेळी समीर भुजबळ म्हणाले की निवडणुकीच्या कामकाजानंतर सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र यावे आणि नाशिकच्या विकासासाठी व जनतेसाठी समस्या सोडवण्यासाठी विरोधक व सत्ताधारी एकत्र होऊन विकास व्हावा या हेतूने या पार्टीचे आयोजन केले होते... कटुताही राजकीय असते व निवडणूक राजकीय विचारांची लढाई असते निवडणुका झाल्या तर आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता समाजामध्ये चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्यावर जबाबदारी असते व समाज एकत्र येऊन विकासावर चर्चा व्हावी यासाठी आपण एकत्र आलो आहोत असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.