ETV Bharat / city

ऑपरेशन ऑक्सिजन चळवळीतील हर्षद कोल्हे या तरुणाचे निधन

रुग्णांना जीवदान देणारे विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेड मिळत नसलेल्या बाधित रुग्णांचा ऑक्सिजनशिवाय श्वास थांबू नये म्हणून हर्षद सातत्याने धडपड करत होता. यासाठी त्याने 'ऑपरेशन ऑक्सिजन' चळवळीतून शेकडोंचा जीव वाचविण्यासाठी आपले योगदान दिले

ऑपरेशन ऑक्सिजन चळवळीतील हर्षद कोल्हे या तरुणाचे निधन
ऑपरेशन ऑक्सिजन चळवळीतील हर्षद कोल्हे या तरुणाचे निधन
author img

By

Published : May 7, 2021, 2:02 PM IST

नाशिक - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्यसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेले मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक हर्षद कोल्हे याचे वयाच्या 31 व्या वर्षी कोरोनामुळे दुःखद निधन झाले. हर्षल याच्या मृत्यूने पंचवटी परिसरात शोककळा पसरली आहे.

आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक व्याधीग्रस्त रुग्णांना जीवदान देणारे विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेड मिळत नसलेल्या बाधित रुग्णांचा ऑक्सिजनशिवाय श्वास थांबू नये म्हणून हर्षद सातत्याने धडपड करत होता. यासाठी त्याने 'ऑपरेशन ऑक्सिजन' चळवळीतून शेकडोंचा जीव वाचविण्यासाठी आपले योगदान दिले. असा हा मराठा क्रांती मोर्चाचा धडाडीचा समन्वयक हर्षद कोल्हे याने मात्र अखेर कोरोनासमोर सपशेल हार पत्करली. गेले काही दिवस हर्षद कोव्हिड १९ वर उपचार घेत होता.मात्र गुरूवारी हर्षदचा श्वास थांबला.

एका खासगी रुग्णालयात सात ते आठ दिवस उपचार करून देखील हर्षदच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर तो व्हेंटिलेटरवर ठेवला, आणि दोनच दिवसात त्याची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली.

500 हुन अधिक रुग्णांना उपलब्ध करून दिले ऑक्सिजन

निःशुल्क ऑक्सिजन सेवेचा वसा घेतलेल्या नाशिक शहरातील अनेक मावळ्यांनी 500 हून अधिक रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. त्या मावळ्यांपैकी एक असलेला हर्षद कोल्हे मात्र अवघ्या एकतीसाव्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला. हर्षदच्या मागे आई आणि पत्नी असून त्याच्या अकाली निधनाने कोल्हे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेने पंचवटीत कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचे सावट पसरले असून नाशिक जिल्ह्यातील सर्व सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी कोविड काळात काम करताना आपण स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य तुषार जगताप यांनी केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.