नाशिक - येथील मुंबई नाका परिसरात एका चालत्या गाडीने पेट घेतल्याची घटना बुधवारी (दि. 27 एप्रिल) घडली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत गाडीचे इंजिन पूर्ण जळाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
गाडीतील इंजिन असलेल्या पुढील भागातून अचानक धूर निघू लागला वाहनचालक आणि वाहनातील इतर सदस्यांनी तत्काळ गाडीच्या बाहेर धाव घेतली त्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. राज्यात 30 एप्रिलपासून पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिकमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी भर उन्हात वाहनातून प्रवास करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही वाचा - Video : आमदार अमोल मिटकरी यांच्या 'त्या' विधानाविरोधात ब्राह्मण समाजाचा भव्य मोर्चा