नाशिक - कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात आज ( शुक्रवारी ) भव्य ग्रंथ दिंडीने ( Marathi Sahitya Sammelan begins in Nashik ) करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पूजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
लेझीम पथक, वारकरी मंडळी व ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरूवात -
यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले, लेझीम पथक, वारकरी मंडळी व ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरूवात करण्यात आली. ग्रंथदिंडीच्या पालखीमध्ये भगवत गिता, ज्ञानेश्वरी व कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा ठेवण्यात आली होती. यावेळी नाशिक पोलीस विभागामार्फत पोलीस व जनता यांच्यातील सुसंवाद वाढवा यासाठी जनजागृतीपर काढण्यात आलेल्या रॅलीतून महाराष्ट्र राज्य पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता या मासिकाची माहिती देण्यात आली आहे.
कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी मार्गस्थ :
दिंडी ही कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून निघून नागरिकांना दिंडीत सहभागी होणे सोयीचे व्हावे. यासाठी टिळकपथ, पोलीस ग्राऊंड, सीबीएस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार, नेहरू उद्यान यामार्गाने सार्वजनिक वाचनालय येथे येवून त्यानंतर बसमधून संमेलन स्थळाकडे ग्रंथदिंडी मार्गस्थ झाली आहे.
हेही वाचा - GITA GOPINATH DEPUTY MANAGING DIRECTOR : गीता गोपीनाथ बनणार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक