नाशिक - वडाळा नाका परिसरातील इगतपुरी चाळ भागात एका घरात 3 एप्रिलच्या मध्यरात्री घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात 8 जखमी झाले असून यातील 5 जण गंभीर आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जुने नाशिक आणि द्वारका परिसरातील वडाळा नाका भागातील इगतपुरी चाळीत झालेल्या या दुर्घटनेत जखमी झालेले आठही जण एकाच कुटुंबातील आहेत. जखमींमध्ये पाच पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट इतका होता की आवाजाने रात्री आजूबाजूच्या परिसरातील घरांमध्ये आणि चाळींमध्ये झोपलेले लोक जागे झाले. दुर्घटना झालेल्या घरातून धूर निघत असल्याने सामजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नासिर खान आणि त्यांच्या मित्र परिवारांना सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले. स्फोट इतका भीषण होता की यामुळे घरातील संसारोपयोगी सामान देखील जाळून खाक झाले. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर वापरताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अपघातात जखमी झालेले रुग्ण -
सय्यद लहकीम (वय 22), सय्यद रहीम (वय 25), रमजान अन्सारी (वय 22), शरीफ अत्तार (53), सोहेब अन्सारी (वय 28), नसरीन सय्यद (वय 25), साहिदा सय्यद (49), मुस्कान अन्सारी (वय 21) सर्व राहणार इगतपुरी चाळ वडाळा नाका अशी जखमींची नावे आहेत.
हेही वाचा - तारापूरमध्ये बजाज हेल्थ केअर कंपनीला भीषण आग