नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 1 लाख 76 हजार 823 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत 32 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 2 हजार 553 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक सुरू असून रोज तीन ते चार हजार नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. सद्यस्थितीत 32 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत 2 हजार 553 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 1 लाख 76 हजार 823 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सक्रीय आहे. त्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. यात चाचण्या, लसीकरण व उपचाराच्या सुविधांवर भर देण्यात येत आहे.
शहर व जिल्ह्यातील उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण -
ग्रामीण भागात नाशिक 588 ,बागलाण 1 हजार 90 इगतपुरी 379,मालेगांव ग्रामीण 855 चांदवड 1 हजार 56, सिन्नर 588, दिंडोरी 529, निफाड 1 हजार 678 देवळा 890,नांदगांव 520, येवला 365, त्र्यंबकेश्वर 169,सुरगाणा 157, पेठ 70, कळवण 425,असे एकूण 9 हजार 507 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 19 हजार 735, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 890 तर जिल्ह्याबाहेरील 209 असे एकूण 32 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 1 लाख 76 हजार 923 रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
नाशिक ग्रामीण मधे 82.71 टक्के, नाशिक शहरात 84.78 टक्के, मालेगाव मध्ये 86.65 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 88.74 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 83.81 इतके आहे. नाशिक जिल्ह्यात 2 हजार 553 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.2 लाख 11 हजार 786 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1 लाख 76 हजार 823 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात 32 हजार 410 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.