नाशिक - नाशिकमधील दंत महाविद्यालयातील 17 विद्यार्थिनी कोरोना बाधित आढळून आल्याची घटना ताजी असताना आणखी 10 विद्यार्थिनींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे, कोरोना बाधित मुलींची संख्या 27 वर जाऊन पोहचली आहे. महानगरपालिकेची पथके दंत महाविद्यालयात रवाना झाली असून मुलींच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी केली जात आहे.
हेही वाचा - Nashik Free-Style Fight : कॉलेजमध्ये दोन तरूणींमध्ये हाणामारी; कारण ऐकून व्हाल थक्क...
अधिक माहिती अशी की, शनिवारी वसतिगृहात व्यवस्थापनाने 52 विद्यार्थ्यांचे घशाचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात 17 विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या होत्या, त्यानंतर मनपा पथकाने वसतिगृहात जाऊन पाहणी केली. ज्या विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या त्यांना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. गरज भासल्यास विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हलवण्यात येणार असल्याचे, मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना बाधित आढळून आलेल्या मुली बाहेरगावाहून आल्या असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. या विद्यार्थिनी कुठून आल्या, कोणाच्या संपर्कात आल्या, याची माहिती घेऊन महानगरपालिका प्रशासन चाचणी करत आहे.
भीतीचे वातावरण
एकीकडे 15 ते 18 वर्षवयोगटांतील मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली असताना, मोठ्या संख्येने एकाच महाविद्यालयात मुली कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - Nashik Wine Bottles Collection : नाशिकच्या 'या' अवलियाकडे आहे विविध 7 हजार मद्य बाटल्यांचा संग्रह