नाशिक - मालेगाव शहरात 16 जानेवारी पासून आजपर्यंत 27865 लोकांना कोरोना लसीचा प्रथम डोस देण्यात अला होता. यापैकी आतापर्यंत फक्त 9 हजार लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्याप 20 हजार नागरिक बाकी असल्याने आरोग्य खत्याच्या वतीने या लोकांना 12 मेपासून कोरोनाच लसीचा दुसऱ्या डोससाठी बोलविले जात आहे. या नागरिकांचे दुसरे डोस पूर्ण करण्याचे आदेश शासनस्तरावररून असल्याने 18 वर्षावरील नवीन लसीकरण थाबवण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी दिली आहे.
नाशिक शहरात 27 केंद्रावर लसीकरण -
नाशिक शहरात गुरुवारपासून शहरातील तीस केंद्रावर पुन्हा लसीकरणास सुरवात झाली. कोविशिल्डचे 10 हजार डोस आल्यामुळे शुक्रवारीही लसीकरण सुरू राहणार आहे, दरम्यान 45 वर्ष वयोगटा पुढील व्यक्तींना पहिला डोस दिला जात आहे. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला त्यांना 45 दिवसानंतर दुसरा डोस दिला जात आहे. नाशिक शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे आणि लसीकरणाचे महत्त्व वाढले आहे. नागरिक लसीकरणाला येऊ लागल्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. एक मे नंतर 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण सुरू झाल्यानंतर गोंधळ उडाला होता. केंद्र शासनाकडून येणाऱ्या लसीतून 45 वर्षे वयोगटातील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस दिला जात होता. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी कोव्हॅक्सिन लस राखीव ठेवल्यामुळे 45 वर्ष वयोगटातील व्यक्तींना या लसीचा दुसरा डोस मिळत नव्हता. मात्र, महानगरपालिकेने राज्य शासनाच्या सुधारित सूचनेनुसार 45 वर्ष वयोगटातील व्यक्तींना सरसकट लसीकरण सुरू केला आहे, ज्यांना कोव्हक्सीनचा डोस घ्यायचा असेल त्यांच्यासाठी तीन स्वतंत्र लसीकरण केंद्रे ठेवली आहेत. त्या व्यतिरिक्त 27 लसीकरण केंद्रावर कोविशिल्डचे दहा हजार डोस दिले जात आहेत.
कोविशिल्ड केंद्र -
पिंपळगाव खांब, रामवाडी, उपनगर, वडाळागाव, स्वामी समर्थ हॉस्पिटल, गंगापूर आरोग्य केंद्र, मखमलाबाद, भारतनगर आरोग्य केंद्र, दसक-पंचक, सिन्नर फाटा उपकेंद्र, एमएचबी कॉलनी सातपूर, संत गाडगे महाराज दवाखाना, हिरावाडी आरोग्य केंद्र, कामटवाडे आरोग्य केंद्र, जिजामाता आरोग्य केंद्र, मेनरोड, म्हसरूळ, एसजीएम, तपोवन, वडनेर, गोरेवाडी संजीवनगर, अंबड, नांदूर, सिडको, रेड क्रॉस मायको, पंचवटी या केंद्रावर लसीकरण सुरू आहे.
कोव्हक्सीन केंद्र
जेडीसी बिटको (नाशिक रोड), रेडक्रॉस (रविवार कारंजा), इएसआयएस (सातपूर)