नागपूर - काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज मंगळवार (दि. 26 जुलै)रोजी ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. त्या विरोधात राज्यासह देशभरात काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले आहे. ( Youth Congress in Nagpur ) दरम्यान, काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळन लागले आहे. नागपूरमध्ये एक गाडी येथे पेटवण्यात आली. ही घटना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराजवळ झाली.
संविधान चौकात सत्याग्रह आंदोलन - आंदोलनाला अचानक हिंसक वळन लागल्यामुळे पोलिसांची धावपळ झाली. आग लागल्याची घटना घडली तेव्हा अग्निशामक दल घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यानंतर ही घटना आटोक्यात आली. काँग्रेसच्या वतीने गांधी घरणण्यावर सुरू असलेल्या ईडी कारवाईच्या विरोधात संविधान चौकात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे.
हेही वाचा - Shinde Govt : ठाकरे सरकारच्या कामांना स्थगिती देत शिंदे सरकारचा नव्या जीआरचा धडाका, काढले 538 जीआर