नागपूर - क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू आणि बुद्धीबळ पंच म्हणून ओळख असलेले उमेश पानबुडेंचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते 48 वर्षाचे असून त्यांच्या निधनाने बुद्धीबळक्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. त्यांना एप्रिल महिन्याच्या शेवटी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अनेक स्पर्धा बुद्धीच्या जोरावर त्यांनी जिंकल्या. मात्र, ते कोरोनाच्या लढ्यात हरले. पहाटे त्यांनी खासगी रुग्णलायत अखेरचा श्वास घेतला.
उमेश पानबुडे यांना 27 एप्रिलला कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांच्याव एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उमेश यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत सहभागी घेत अनेक बक्षीसेसुद्धा मिळवली होती. यात त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये पंच म्हणून सुद्धा योगदान दिले आहे. उमेश यांनी विदर्भात अनेक युवा बुद्धीबळपटू घडवले होते. ते बुद्धीबळ शिकवणे आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही करत होते. विशेषकरून त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना बुद्धीबळांची आवड निर्माण व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न केले. त्यांच्यांतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले होते. यातून त्यांनी बुद्धीबळ या खेळात युवकाना प्रोत्साहन देऊन खेळाडू घडवले आहेत.
प्रकृती बिघडल्याने 27 तारखेला त्यांच्यावर खासगी रुग्णलयाय उपचार सुरू होते. या उपचारा दरम्यान त्यांची प्रकृती बिघडत गेली. अखेर डॉक्टरांचे उपचराला प्रतिसाद न मिळाल्याने प्रकृती खालावत गेली. पाहटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने क्रीडा क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून क्रीडा क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.