नागपूर - विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात 'शक्ती' कायद्या मंजूर करण्यात आला आहे. याचे राज्यभरातील विविध क्षेत्रातील महिलांकडून स्वागत होत आहे. नागपुरातही अखिल भारतीय सत्यशोधक महिला संघटनेकडून पेढे वाटत या कायद्याचा आनंदोत्सव साजरा केला. शिवाय लहान मुलीला न्याय देवतेच्या प्रतिकात्मक रुपात उभारून महिला सक्षमीकरणाचा नाराही देण्यात आला. हा आनंदोत्सव शहरातील चिल्ड्रन पार्क येथे साजरा करण्यात आले.
महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी 'शक्ती कायदा' अमलात येणार आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने पाऊल टाकले आहे. या कायद्याचे राज्यभरातील महिलांकडून स्वागत करत आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. नागपुरातही विविध महिला संघटनाकडून या कायद्याला समर्थन देत आनंद साजरा करण्यात येत आहे.
महिलांना सक्षम करणारा कायदा, सरकारचे अभिनंदन
अशावेळी महिलांसाठी शक्ती कायदा हे अधिकच सक्षम करणारा आहे. अशी भावनाही महिलांकडून व्यक्त करण्यात आली. शिवाय राज्य सरकारने मंजूरी दिलेल्या शक्ती कायद्यामुळे येणाऱ्या काळात न्याय मिळण्यास विलंब होणार नाही. त्यामुळे या कायद्याबद्दल राज्य सरकारचे सर्व महिलांकडून अभिनंदन आम्ही अभिनंदन करतो. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यां पूजा मानमोडे यांनी दिली.
विकृत नराधमांना वेळीच चपराक, महिलांसाठी सुरक्षेचा कवच
तसेच या कायद्यातील तरतुदी पहाता महिलांवर अन्याय करणाऱ्या नराधमांना सरळ २१ दिवसांच्या आता फाशीची शिक्षा मिळेल. त्यामुळे महिलांना वेळीच न्याय देणारा हा कायदा आहे. असे मानमोडे म्हणाल्या. अशावेळी महाराष्ट्रात आता महिलांना शक्ती कायद्याच्या माध्यमातून सुरक्षेचं कवच मिळाले आहे. त्यामुळेच आम्ही आनंदोत्सव साजरा करतोय. अशी भावनाही यावेळी महिलांनी बोलून दाखविली. या आनंदोत्सवात महिलांनी एकमेकांना पेढे भरवत अभिनंदन केले. तसेच 'शक्ती कायद्याचे महाराष्ट्रात स्वागत', 'शक्ती कायद्याने महिलांना मिळणार न्याय' अशा आशयाचे फलकही दर्शवण्यात आले.