ETV Bharat / city

Suicide Case Nagpur : पतीने चॅट करताना हटकल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; वाचा एकाच शहरातील दोन घटना

आत्महत्येचे सारखेच कारण असलेल्या दोन घटना एकाच आवड्यात उपराजधानीत घडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यातील एक घटना यशोधरा नगर पोलीस स्टेशन येथे तर दुसरी घटना सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे. तसेच तिसऱ्या घटनेत पत्नीने दारू पिण्यास हलटकल्याने पतीने आत्महत्या केल्याचीही घटना घडली आहे.

नागपूर क्राईम
नागपूर क्राईम
author img

By

Published : Dec 31, 2021, 2:24 PM IST

नागपूर - मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोणी हटकले तरी असह्य होतं. एवढ्याच क्षुल्लक करणातून दोन विवाहित महिलांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. सारखेच कारण असलेल्या दोन घटना एकाच आवड्यात उपराजधानीत घडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यातील एक घटना यशोधरा नगर पोलीस स्टेशन येथे तर दुसरी घटना सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे. तसेच तिसऱ्या घटनेत पत्नीने दारू पिण्यास हलटकल्याने पतीने आत्महत्या केल्याचीही घटना घडली आहे.

चिमुकला रडत राहिला अन् आईने गळफास घेतला -

नागपूरच्या संजय गांधी परिसरात मनाला चटका लावणारी एक घटना समोर आली आहे. मेघा सुरज कांबळे हिने पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. यामध्ये मृतक मेघाचा तीन वर्षांपूर्वी त्याच परिसरात राहत असलेल्या सुरज कांबळे सोबत प्रेम विवाह झाला होता. सुखी संसार सुरू होता. यात पत्नीही वारंवार मोबाईल वर दिसत असल्याने नेहमीप्रमाणे पती सुरजने तिला हटकले. शुल्लक कारणातून वाद झाला. ती माहेरी निघून गेली. माहेरी घरात नसतांना तिने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या देखत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. कुटुंबियांची कुठलीही तक्रार नसून हटकल्याच्या करणातून आत्महत्या केल्याचे यात यशोधरा नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी ईटीव्ही भारताशी बोलतांना सांगितले.

अपमानाची भावना मनात ठेवत आत्महत्या -

दुसरी घटना नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शिवगाव सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडल्याचे समोर आले. पूनम राजकुमार डगवार असे मृत महिलेचे नाव आहे. पती राजकुमार डगवार झारखंडला कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी ते सुट्टीवर घरी आले होते. याच यादरम्यान ते सासुरवाडीला मुक्कामी गेले होते. झारखंडला जाण्यापूर्वी त्याने पूनम ही मोबाईलवर कोणाशी तरी चॅटिंग करत असताना आढळली. त्यामुळे त्याने तिला हटकले. याच करणावर आई वडिलांनीही तिला रागावले. त्यानंतर पती पुन्हा झारखंडला सुट्ट्या संपल्यानंतर निघून गेला. पण पूनमला अपमान झाल्यासारखे वाटल्याने पूनमने चक्क आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. या संदर्भात माहिती तपास करत असलेल्या पोलीस कर्मचारी दिलीप बेलेकर यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.

दारू पिण्यास हटले म्हणून पतीचा गळफास -

तिसरी विचित्र घटना एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनगर येथे घडली. पत्नीने दारू पिण्यासाठी हटकल्याने पतीने गळफास लावून आत्महत्या केली. मुकेश शिंगाडे असे या 20 वर्षीय मृतकाचे नाव आहे. मुकेश हा मूळचा भंडारा जिल्ह्यातील तुमसरचा राहवासी होता. त्याचा दोन वर्षांपूर्वी शेजारी रहाणाऱ्या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. घरच्यांचा विरोध असलल्याने तो नागपुरात आला. एमआयडीसीमध्ये काम करत सुखी संसार सुरू झाला. त्याला चार महिन्याचा मुलगा आहे. दरम्यान त्याला दारूचे व्यसन लागले. याच कारणावरून हटकल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत होते. 28 डिसेंबराला असच वाद झाला. 29 डिसेंबराला त्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.