ETV Bharat / city

Wall Collapsed : घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू - Continuous rains in Nagpur

नागपुर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या ( Ajni Police Station ) हद्दीतील बाबूळखेडा येथे भिंत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू ( One person died after wall collapsed ) झाला आहे. जीर्ण घरात भाड्याने राहत असलेल्या किशोर केसलवार ( Kishor Kesalwar ) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर, त्रिवेणी केसलवार या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

One person died after wall collapsed
घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू
author img

By

Published : Jul 15, 2022, 10:19 PM IST

नागपूर - गेल्या काही दिवसांपासून नागपुरात पावसाची संततधार ( Continuous rains in Nagpur ) सुरू आहे,त्यामुळे जीर्ण झालेल्या घराची एक भिंत कोसळली. त्यावेळी केसलवार कुटुंब जेवणासाठी बसलेले होते. अचानक एक भिंत कोसळल्याने किशोर केसलवार ( Kishor Kesalwar ) भिंतीच्या मलब्या खाली दबले गेले,त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्या पत्नी त्रिवेणी केसलवार या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर बाभूळखेडा परिसरातील लोकांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी किशोर यांना मृत घोषित केले.

भिंत कोसळली

हेही वाचा - Sharad Pawar Criticized Shinde Government :...तर मी शिंदे सरकारचं अभिनंदन केलं असतं - शरद पवार

घर रिकामे करण्याची सूचना केली होती - प्रत्यक्षदर्शींच्या मते घर अतिशय जीर्ण झाले असल्याने घरमालकाने भाडेकरु केसलवार यांना घर रिकामे करण्यात सांगितले होते. मात्र, परिस्थिती हलाखीची असल्याने ते दुसरं घर कुठे घेणार या विचाराने ते एक-एक दिवस काढत होते. शेवटी नियतीने डाव साधला आणि ही दुःखद घटना घडली. सुदैवाने घटेनच्या वेळी केसलवार यांचे दोन मुलं कामासाठी बाहेर गेली असल्याने ते बचावले आहेत.

Wall Collapsed
घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. (Heavy rain in Nagpur ) दिवसभरात शहरात अनेक भागात धुंवाधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. अशात विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील (Jamtha of Vidarbha Cricket Association ) मैदानात आणि परिसरात देखील मोठ्या प्रमाणात सुमारे गुडघाभर पाणी साचल्यानचे बघायला मिळाले. तर क्रिकेट स्टेडियम जलमय झाल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा - Uddhav Thackeray : शिवसैनिकावर हल्ला, उद्धव ठाकरे संतापले; म्हणाले, 'जीवाशी येत असेल तर खपवून...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.