नागपूर - कोरोनाच्या काळात ४० हजार इतके वाढीव वीज बिल आल्यामुळे नागपुरातील लीलाधर गायधने यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्याने गायधने यांनी आत्महत्या केली असे त्यांच्या घरातील लोकांचे मत आहे. प्रकरणी ऊर्जामंत्र्यांसह ऊर्जा सचिवांवर गुन्हे दाखल करा. अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली आहे. नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे ही मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लीलाधर गायधने यांच्या पत्नीच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले.
वाढीव वीज बिल आल्यामुळे नागपुरातील यशोधरा नगरातील लीलाधर गायधने यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. या आत्महत्येला महावितरण व ऊर्जा विभाग जबाबदार आहे, त्यामुळे ऊर्जामंत्र्यांसह त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. अशी मागणी मृत लीलाधर गायधने यांच्या पत्नी व विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून करण्यात आली आहे. ऊर्जा विभागाच्या धसक्यामुळेच गायधने यांनी आत्महत्या केली असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. शिवाय गायधने यांनी वाढीव वीज बिल बाबत अनेकवेळा संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन बिल कमी करण्याची मागणी देखील केली होती. परंतु त्यांना कोणताही दिलासा किंवा उत्तर न देता उलट वीज बिल कनेक्शन कट केल्या जाईल. अशा धमक्या देण्यात आल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे ही आत्महत्या नाही तर हत्या असून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
सोबतच कमवत्या पतीच्या जाण्यामुळे परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पती लीलाधर गायधनेंना न्याय द्या, अशी मागणी पत्नी रेखा गायधने यांनी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेला ऊर्जामंत्री व विद्युत विभागाचे अधिकारी जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करा अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून करण्यात आली आहे. त्यामुळे जर वीज बिल तत्काळ माफ केले असते, तर गायधने यांनी आत्महत्या केली नसती. शिवाय या पुढे अशा घटना घडू नये यासाठी ऊर्जामंत्र्यांनी स्वतः दखल घ्यावी अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते राम नेवले यांनी दिली. त्यामुळे यापुढे विद्यूत विभागाने गांभीर्याने घ्यावे, अन्यथा अशा घटनांना योग्य उत्तर देऊ असा इशाराही राम नेवले यांनी दिली आहे.
हेही वाचा - फेसबुक 'अलर्ट'मुळे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तिचा वाचला जीव; मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना यश