ETV Bharat / city

नागपुरात अपघातामध्ये दोघांचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - Nagpur Police News

नागपूरच्या सीए मार्गावरील भावसार चौकात दोन दुचाकींची धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

two-wheeler-accident-in-nagpur
व्हिडिओ व्हायरल: दुचाकींच्या अपघातात दोघांचा मृत्यू
author img

By

Published : Feb 13, 2020, 1:53 PM IST

नागपूर - सेंट्रल एव्हेन्यूवर भरधाव वेगानं दोन दुचाकीस्वारांनी एकमेकांना धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. सीए मार्गावरील भावसार चौकात झालेल्या या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे.अभिजीत जंगम ( 21 वर्ष ) आणि मोहम्मद जुबैर मोहम्मद साबिर (20 वर्ष ), अशी मृत तरुणांची नावे आहेत.

व्हिडिओ व्हायरल: दुचाकींच्या अपघातात दोघांचा मृत्यू

अभिजीत जंगम त्याचे दोन मित्र जुबैर आणि शिवम यांच्यासोबत दुचाकीवरून ट्रिपल सिट भरधाव वेगाने सेंट्रल एव्हेन्यूवरून जात असताना हा अपघात झाला. भावसार चौकात दोन्ही दुचाकीस्वारांची एकमेकांना धडक झाली. या अपघातत अभिजीत आणि जुबैर या दोघांचा मृत्यू झाला, तर शिवम व दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीतमध्ये कैद झाला आहे. ज्या ठिकाणी अपघात घडला तो संपूर्ण परिसर वर्दळीचा आहे. मात्र, दोन्ही दुचाकीस्वार वेगाने गाडी चालवत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.