ETV Bharat / city

Nagpur Crime : नागपुरात 12 तासात दोघांची हत्या; आरोपींना अटक - कोराडीत बापाने केली मुलाची हत्या

घरी पाणी भरत नाही या कारणावरून क्रूर बापाने दहा वर्षीय मुलाची ( The father killed the ten year old boy in koradi ) हत्या केली आहे. तर दुसरी घटना जरीपटका पोलीस ( Jaripatka police ) ठाण्याच्या हद्दीतील बेझनबाग भागात ( Bezenbag Murder Case ) घडली आहे. आईवरून शिवी दिल्याच्या कारणावरून एका बांधकाम मिस्त्रीने सहकारी कामगाराच्या डोक्यात लाकडी दांडू मारून हत्या केली आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.

Nagpur Crime
Nagpur Crime
author img

By

Published : May 24, 2022, 3:39 PM IST

Updated : May 24, 2022, 3:48 PM IST

नागपूर - दोन खुनाच्या घटनांनी नागपूर शहर हादरले आहे. अवघ्या 12 तासात नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. घरी पाणी भरत नाही या कारणावरून क्रूर बापाने दहा वर्षीय मुलाची ( The father killed the ten year old boy in koradi ) हत्या केली आहे. तर दुसरी घटना जरीपटका पोलीस ( Jaripatka police ) ठाण्याच्या हद्दीतील बेझनबाग भागात ( Bezenbag Murder Case ) घडली आहे. आईवरून शिवी दिल्याच्या कारणावरून एका बांधकाम मिस्त्रीने सहकारी कामगाराच्या डोक्यात लाकडी दांडू मारून हत्या केली आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस अधिकारी

पहिली घटना : दोन दिवसांपूर्वी कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरादेवी झोपडपट्टी भागात घडली आहे. क्रूर दारुड्या बापाने स्वतःच्याच मुलाची गळा आवळून हत्या केली आहे. गुलशन उर्फ गबरू मडावी, असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे तर संतलाल मडावी असे निर्दयी बापाचे नाव आहे. आरोपी संतलाल मडावी हे चाकू सूरी आणि कैचीला धार लावण्याचा व्यवसाय करतात. आरोपी संतलालला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी चार वर्षांपूर्वीचे् विभक्त झाली होती. दारू पिऊन संतलाल हा दोन्ही मुलांना रोज मारहाण करायचा. रविवारी दुपारी मुलगा गुलशन उर्फ गबरूला घरी पाणी न भरल्यामुळे आरोपी बापाने प्रचंड मारहाण केली. एवढ्यावर त्याचे समाधान न झाल्याने त्याने गळा आवळून स्वतःच्याच मुलाची हत्या केली. घटनेच्या वेळी मृतक गबरूची बहीण घराबाहेर गेली होती. कुणालाही काहीही कळू नये यासाठी तो घराचे दार बंद करून बाहेर पडला. मात्र, काही वेळाने तो घरी परत आला. तेव्हा मुलागा हा झोपडीत मृतावस्थेत पडून असल्याचे लोकांना सांगत होता. या घटनेची माहिती समजताच कोराडी पोलिसांनी आरोपी
संतलालची विचारपूस केली. तेव्हा पोलिसांना त्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताचे आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.

दुसरी घटना : ही जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेझनबागमध्ये घडली आहे. महादेव सोनूले नामक 63 वर्षीय वृद्ध व्यक्तीने त्यांचे सहकारी तिलक चव्हाण (32)च्या डोक्यात लाकडी दांडूने वार करून हत्या केली. आरोपी महादेव सोनूले हे बांधकाम मिस्त्री म्हणून काम करतात तर तिलक चव्हाण हा त्यांचा हेल्पर म्हणून काम करतो. सोमवारी संध्याकाळी हे दोघेही एका बांधकाम साईटवर काम करत असताना दोघांमध्ये वाद झाला. यावेळी मृतक तिलक चव्हाण याने महादेव सोनूले यांना आईवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे संतापलेल्या महादेव सोनूले यांनी तिलकच्या डोक्यावर लाकडी दांडूने वार केला. जखमी तीलकला रक्ताच्या थारोळ्यात कोसळला असता स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले आहे.

दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक : अवघ्या काही तासात दोन हत्येच्या घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कोराडी पोलिसांनी स्वतःच्या दहा वर्षीय मुलाची हत्या केल्याप्रकरणी आरोपी संतलाल मडावी याला अटक केली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणात आरोपी महादेव सोनूले यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - Pune ATS : टेरर फंडींग प्रकरणी पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडून एकाला अटक

Last Updated : May 24, 2022, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.