नागपूर नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पात अपघात झाला आहे. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला two deaths in Khaparkheda power accident आहे. कोळसा वाहक स्टॅकर बेल्ट तुटून कामगारांच्या अंगावर पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री घडली आहे. यामध्ये संतोष मेश्राम आणि प्रवीण शेंडे यांचा मृत्यू झाला आहे.
दीड हजार टन वजन असलेला स्टॅकर बेल्ट काही दिवसांपासून नादुरुस्त होता, याबाबत अधिकाऱ्यांना सांगून देखील दुर्लक्ष केल्याने घडली घटना असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली जाते Khaparkheda power accident आहे.
कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही औष्णिक वीज ( Koradi and Khaparkheda Thermal Power Plants ) प्रकल्पातून निघणाऱ्या राखेमुळे राख बंधारा आणि वीज केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरतील अनेक गावे प्रदूषणाचे गंभीर परिणाम सोसत होते. तेच पावसाळ्यात खसाळा राख बंधारा फुटून ( Khasala Rakh Dam Burst ) आणि खापरखेडा पाईपलाईन फुटून राख नदीत पोहचली. हेच पाणी शरीरात जाऊन धोकादायक ठरत आहे.
आरोग्यावरही दुष्परिणाम : राखेचा बंधारा फुटून राखेच्या चिखलामुळे शेतजमीन उद्ध्वस्त झाली. शिवाय जमिनीतील जलसाठा नदी-नाल्यांचे प्रदूषण होऊन पर्यावरणीय नुकसान झाले. यातच मागील अडीच वर्षांपासून औष्णिक वीज केंद्राच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या "सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेतील अभ्यासकांच्या मते राख गळतीचे दृश्य परिणामापेक्षा आरोग्यावरील अदृश्य परिणाम जास्त गंभीर असल्याचा दावा केला आहे. या अभ्यासात शरीरासाठी घातक हेवी मेंटल्स, अल्युमिनियम, अँटीमनी, कॅडमियम, बोरॉन, आरसेनिक, लिथिनियम, सिलिनियम, वेनेडियम आणि मर्क्युरीसारख्या धातूंचा समावेश आहे.
विद्युत निर्मिती ( Power Generation) होत असलेल्या लगतच्या गावात हवा आणि पिण्याच्या पाण्यामध्ये आरोग्यास धोकादायक असे आर्सेनिक अल्युमिनियम, लिथियम विषारी धातू मोठ्या प्रमाणात मिळून आल्याचे अहवालात मांडण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा हे दोन्ही औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. त्यामध्ये कुठला खंड पडला नाही. पण याची मोठी किंमत स्थानिक नागरिकांना चुकवावी लागत आहे. सोबतच पर्यावरण भूजल आणि भूमीला, शेतकरी पुत्राला यांच्या धोकादायक परिणामांना समोर जावे लागत आहे. या दोन्ही प्रकल्पाचा विस्तार वाढत चालला आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा मात्र विसर पडलेला दिसून येत आहे.