ETV Bharat / city

पोपट तस्करी प्रकरणात दोघांना अटक; वनविभाग व पशुप्रेमी संस्थांची संयुक्त कारवाई - नागपूर वनविभागाची पोपट विक्रेत्यांवर कारवाई न्यूज

आरोपी शेख आबीद नासीर खान आणि रुक्साना बेगम यांच्या जवळून २६ पोपट, ९ कबुतरे आणि मोठ्या प्रमाणात पिंजरे आढळून आले आहेत. पोपट तस्करीसाठी उपयोगात आणण्यात येत असलेली एक दुचाकी सुद्धा वनविभागाने जप्त केली आहे. पोपट तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९, ४८-अ, ५०, ५१ चे उल्लंघन झाल्याने कार्यवाही करण्यात आली आहे.

नागपूर पोपट तस्करी प्रकरण न्यूज
नागपूर पोपट तस्करी प्रकरण न्यूज
author img

By

Published : Nov 5, 2020, 5:46 PM IST

Updated : Nov 5, 2020, 6:40 PM IST

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा आणि कळमेश्वर वनपरिक्षेत्रच्या जंगलातून मोठ्या प्रमाणात पोपट पकडून ते नागपूर शहरात विकले जातात. शहरात मोठ्या प्रमाणात जंगली पोपटांची विक्री आठवडी बाजारातून केली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार दोन वेगवेगळी पथके तयार करून लकडगंज आणि मोतीबाग परिसरात छापे टाकण्यात आले.

पोपट तस्करी प्रकरणात दोघांना अटक

हेही वाचा - धुळे : प्राचीच्या मारेकऱ्यांचा शोध घ्या, माळी समाजाची मागणी

या वेळी, आरोपी शेख आबीद नासीर खान आणि रुक्साना बेगम यांच्या जवळून २६ पोपट, ९ कबुतरे आणि मोठ्या प्रमाणात पिंजरे आढळून आले आहेत. पोपट तस्करीसाठी उपयोगात आणण्यात येत असलेली एक दुचाकी सुद्धा वनविभागाने जप्त केली आहे. पोपट तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९, ४८-अ, ५०, ५१ चे उल्लंघन झाल्याने कार्यवाही करण्यात आली आहे.

पोपटांची तस्करी, विक्री प्रतिबंधित

वन्यपक्षी पोपट हा भारतीय संरक्षण १९७२ चे अनुसूची - IV Sr. NO.50 मध्ये समाविष्ट असून सदर पोपट पक्षांची अवैधपणे खरेदी-विक्री व वाहतुकीस कायद्यान्वये प्रतिबंध आहे. मात्र, हे दोनही आरोपी गेल्या काही काळापासून पोपटांसह जंगली पक्षांची विक्री आणि तस्करीच्या कामात गुंतलेले आहेत. पशुप्रेमींनी या संदर्भात वनविभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर वनविभागाने पशुप्रेमींच्या मदतीने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा - सातारा : महाबळेश्वर-पाचगणीसह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्यास परवानगी, मात्र...

Last Updated : Nov 5, 2020, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.