ETV Bharat / city

प्रेमसंबंधामुळे १६ वर्षीय रोहितचा खून, ३ आरोपींना अटक

आरोपींनी खून करुन मृतदेह नागपूरच्या भांडेवाडी येथील डम्पिंग येथील पाण्याच्या टाकीमध्ये टाकला होता. मृत रोहितच्या बहिणीचे आरोपी शानु सोबत प्रेम सबंध होते. रोहितला हे अमान्य होते.

आरोपी अटक
author img

By

Published : Mar 30, 2019, 1:25 PM IST

नागपूर - प्रेम संबंधामुळे एका १६ वर्षीय रोहित रंगारी युवकाचा खून करण्यात आला होता. आरोपींनी खून करुन त्याचा मृतदेह नागपूरच्या भांडेवाडी येथील डम्पिंग येथील पाण्याच्या टाकीमध्ये टाकला होता. मनपा नागपूर कर्मचाऱ्यांना २४ मार्चला त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. त्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यातील कर्मचाऱयांनी अग्निशामन दलाच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. शवविच्छेदनांतर नंदनवन पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला होता.

घटनेची माहिती देताना पोलीस अधिकारी

या प्रकरणात कोणताही धागादोरा सापडत नव्हता. अखेर पोलीस उपायुक्त रोशन तिलक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची यादी मागविण्यात आली. त्यानुसार, पोलिसांना मिळालेल्या यादी मध्ये २२ मार्चपासून कुही पोलीस ठाण्याहद्दीतील चिपडी या गावात रोहित नामक युवक बेपत्ता झाला आहे, अशी माहिती समोर आली. रोहितचे वर्णन मिळतेजुळते वाटल्याने पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यांनी मृतदेह रोहितचा असल्याचे सांगितले. रोहितच्या डोक्यावर जखमा दिसल्याने कोणी तरी हत्या केली असल्याचा पोलिसांना संशय व्यक्त करत गुन्हेगारांचा तपास सुरू केला.

मृत रोहितच्या बहिणीचे आरोपी शानु सोबत प्रेम सबंध होते. रोहितला हे अमान्य होते. त्याने केलेल्या विरोधामुळे प्रेमात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे आरोपींनी रोहितचा काटा काढायचा म्हणून त्याला नागपुरात जेवण पार्टीच्या नावाने घेवून गेले. त्यांनी जेवणा केल्यानंतर भांडेवारी परिसरात त्याच्या डोक्यावर अवजड वस्तूने मारून त्याला ठार केले. त्याचा मृतदेह तेथील पाण्याच्या टाक्यामध्ये टाकला व पोबारा केला. कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना देखील या हत्येचा तपास करून आरोपींना अटक करण्याची कामगिरी उपायुक्त रोशन तिलक व सहआयुक्त घार्गे व सहआयुक्त धोपावर व नंदनवन पोलीस ठाणेदार चव्हाण व इतर पोलीसांनी सहकार्य केले.

Intro:प्रेम संबंधावरून एका १६ वर्षीय रोहित रंगारी युवकाची हत्या करण्यात आली. व त्याला तिघा आरोपीनी नागपूरच्या भांडेवाडी येथील डम्पिंग च्या पाण्याच्या टाकिमध्ये टाकले २४ मार्चला मनपा नागपूर कर्मचाऱ्यांना एक मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला त्यानंतर नंदनवन पोलिस स्थानकामध्ये घटनास्थळी बोलावले पोलिसांनी अग्निशामन दलाच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला.शवविच्छेदनांतर नंदनवन पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला.

Body:या प्रकरणात कोणताही धागादोरा सापडत नव्हता. अखेर पोलीस उपायुक्त रोशन तिलक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची यादी मागविण्यात आली. त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या यादी मध्ये २२ मार्च पासून कुही पोलीस ठाण्याहद्दीतील चिपडी या गावात रोहित नामक युवक बेपत्ता झाले आहेत अशी माहिती दिली. रोहितचे वर्णन मिळतेजुळते वाटल्याने पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. आणि त्यांनी मृतदेह रोहित रंगारी असल्याचे सांगितले.रोहितच्या डोक्यावर जखमा दिसल्याने कोणी तरी हत्या केली असल्याचा पोलिसांना अंदाज व्यक्त केला. व गुन्हेगारांचा शोधतपास सुरू झाला.

Conclusion:त्यात रोहितच्या गावातीलच हत्या करणारे तिघाना पोलिसांनी अटक केली आरोपींचे नाव शानू इक्बाल शेख (वय२२) ,विकी उर्फ विराज मधुकर पाटील (वय १९) असून यात एक अल्पवयीन गुन्हेगार याचाही समावेश आहे. सदर प्रकरण समोर आले की मृतक रोहितच्या बहीणेचे आरोपी शानु सोबत प्रेम सबंध होते व ते रोहितला अमान्य होते. त्यामुळेच त्याने केलेल्या विरोधामुळे प्रेमात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे आरोपींनी रोहितचा काटा काढायचा म्हणून त्याला नागपुरात जेवण पार्टी च्या नावाने घेऊन आले. व त्यांनी जेवणानंतर भांडेवारी परिसरात त्याच्या डोक्यावर अवघड वस्तूने मारून त्याला ठार केले व त्याचा मृतदेह तेथील पाण्याच्या टाक्यामध्ये टाकला व पोबारा केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींची सारबत्ती करताच तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. व सदर घटनाक्रम पण उलगडला. कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना देखील या हत्येचा तपास करून आरोपींना अटक करण्याची कामगिरी उपायुक्त रोशन तिलक व सहा आयुक्त घार्गे व सहा आयुक्त धोपावर व नंदनवन पोलीस ठाणेदार चव्हाण व इतर पोलीस सहकार्यांनी बजावली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.