ETV Bharat / city

Nagpur Crime : नागपुरात दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना अटक - वाहन चोरी करण्याऱ्या टोळीला यशोधरानगर पोलिसांनी केली अटक

50 ते 60 पेक्षा अधिक दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीला नागपुरातील यशोधरानगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विविध भागातून वाहनांची चोरी करुन त्यांची पार्टस् विकत असे, मिळालेल्या माहिती पोलिसांनी सोपळा रचत तिघांना अटक केली आहे.

जप्त केलेली वाहने
जप्त केलेली वाहने
author img

By

Published : Feb 27, 2022, 8:51 PM IST

Updated : Feb 27, 2022, 8:59 PM IST

नागपूर - शहराच्या विविध भागातून तब्बल 50 ते 60 पेक्षा अधिक दुचाकी वाहन चोरून त्याचे पार्ट्स भंगारमध्ये विकणाऱ्या टोळीच्या तीन सदस्यांना नागपूर शहरातील यशोधरानगर पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित 4 आरोपींचा शोध सुरू आहे. दुचाकी चोरल्यानंतर टोळी एका घरात गाडीचे पार्ट्स काढले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत 6 दुचाकी आणि चार कापलेल्या दुचाकी आढळून आल्या आहेत. यशोधरानगर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून यामध्ये विक्की राजबहादूर शाहू, भूषण बरगट आणि टेमकुमार बनिया या आरोपींचा समावेश आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त

यशोधरानगर पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहीतीनुसार, काही संशयित व्यक्ती विनोबा भावे नगर गेट समोर उभे असून त्यांच्याकडे चोरीचे वाहन आहे. माहीती मिळताच पोलिसांचे एक पथक तत्काळ विनोबा भावे नगर गेट जवळ दाखल झाले. पोलिसांना बघून ते तिघांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी योग्य सापळा रचत शिताफीने तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यात सहभागी आल्याचे कबूल केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या माहिती वरूनच पोलिसांनी त्यांच्या वर्कशॉपमध्ये धाड टाकली.

50 ते 60 गाड्या चोरल्याची दिली कबुली

पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली तेव्हा ते उडवा उडवीचे उत्तर देत होते. मात्र पोलिसांनी आपल्या स्टाईलने चौकशी सुरू करताच आरोपींनी सर्व माहिती दिली. नागपुर शहरातील यशोधरानगर, शांतीनगर, जरीपटका कपीलनगर लकडगंज कोतवाली, पाचपावली सह इतर पोलीस स्टेशन हद्दीतुन 50 ते 60 गाडया चोरी केल्याचे कबूल केले आहे.

हेही वाचा - जादूटोणा संशयातून दाम्पत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावातील प्रकार

Last Updated : Feb 27, 2022, 8:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.