ETV Bharat / city

असा असेल नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा - केंद्रीय अर्थसंकल्प 2021

आज केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेट मध्ये नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज - २ चा समावेश केला आहे.

नागपूर मेट्रो
नागपूर मेट्रो
author img

By

Published : Feb 1, 2021, 9:18 PM IST

नागपूर - आज केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेट मध्ये नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज - २ चा समावेश केला आहे. नागपूर शहराची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक परिवहनाचे साधन तसेच सध्याच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज - १ ची प्रगती बघता हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासोबत नाशिक येथील मेट्रो नियो प्रकल्पाचा देखील समावेश करण्यात आला आहे. आज केंद्रीय वित्त मंत्री श्रीमंती निरमला सीतारामन यांनी लोकसभेच्या पटलावर या दोन्ही शहराच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज - २ मध्ये ५९७६ कोटी व नाशिक मेट्रो नियो करिता २०९२ कोटी रुपयाची घोषणा केली आहे.

नागपूर मेट्रो

३२ मेट्रो स्टेशनचा समावेश-

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा फेज - २ हा ४३.८ कि.मी लांबीचा असून यामध्ये ३२ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. उल्लेखनीय आहे की, नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज २ ला ८ जानेवारी २०१९ व नाशिक मेट्रो रेल प्रकल्पाला २८ ऑगस्ट २०१९ रोजी राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली होती.

असा असेल नागपूर मेट्रो फेज - २

  • आटोमोटिव्ह चौक ते कन्हान-

लांबी : १३ कि. मी. स्टेशन : पिली नदी, खसारा फाटा, ऑल इंडिया रेडियो, खैरी फाटा, लोक विहार, लेखा नगर, कॅन्टोन्मेंट, कामठी पोलीस स्टेशन, कामठी नगर परिषद, ड्रॅगन पॅलेस, गोल्फ क्लब, कन्हान नदी

  • मिहान ते बुटीबोरी ईएसआर-

लांबी : १८.७ कि. मी. स्टेशन: ईको पार्क स्टेशन, मेट्रो सिटी स्टेशन, अशोकवन, डोंगरगांव, मोहगांव, मेघदूत सिडको, बुटीबोरी पोलीस स्टेशन, म्हाडा कॉलोनी, एमआयडीसी – केईसी, एमआयडीसी - ईएसआर

  • प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर-

लांबी : ५. ५ कि. मी. , स्टेशन: पारडी, कापसी खुर्द, ट्रांसपोर्ट नगर

  • लोकमान्य नगर ते हिंगणा-

लांबी : ६.६ कि. मी. , स्टेशन: हिंगणा माउंट व्ह्यू, राजीव नगर, वानाडोंगरी, एपीएमसी, रायपूर, हिंगणा बस स्टेशन, हिंगणा.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही नाही, निवडणूक असलेल्या राज्यांसाठी हात सैल - भुजबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.