नागपूर: अशोक राऊत हे उमरेड येथील कोळसा खाणीत वाहन चालक या पदावर कार्यरत होते. ते उमरेड वरून नागपूरला कारने येत असताना पाचगाव जवळ त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव गाडी रस्ते दुभाजकावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की, गाडीने अचानक पेट घेतला. त्या मार्गाने जात असलेल्या अनेकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले,मात्र आग इतकी भीषण होती की कुणालाही त्यात यश आले नाही. अखेर अशोक राऊत यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.अशोक राऊत यांना बरे वाटत नव्हते, त्यांना छातीत दुखू लागल्यामुळे ते स्वतःच्याच कार ने नागपूर येथे रुग्णालयात जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान त्यांच्या वाहनाला अपघात झाला. राऊत यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज बांधला जात आहे.
Car Accident:अपघातानंतर कारने पेट घेतला, वेकोली कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू - वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड
भरधाव कारची दुभाजकाला धडक (The car hit the divider) लागल्यामुळे झालेल्या आपघातात कार ने पेट घेतला,या घटनेत कार चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उमरेड येथे घडली. अशोक राऊत असे त्या कार चालकाचे नाव आहे. ते वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड - वेकोली (Western Coalfields Ltd.) येथे कार्यरत होते.