नागपूर आतापर्यंत कोरोना महामरीने हैराण केले असताना, आता स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या Increasing Swine Flu Patients in Nagpur वाढत, मृत्यूची संख्या 10 पर्यंत पोहचली 10 Deaths by Swine Flu in Nagpur आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असताना, स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडली आहे. आरोग्य समितीच्या अहवालानुसार डेथ ऑडिटमध्ये आतापर्यंत 10 रुग्ण दगावले असून, काही संशयित आहेत. तेच रुग्णसंख्या वाढवून दोनशेपार जात 211 इतके रुग्ण Swine Flu Cases Cross 200 in Nagpur झाले आहेत. आता काही रुग्णांवर उपचार सुरू Some Patients are Being Treated Nagpur आहेत.
शहरातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची आकडेवारी नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार शहरात 129 रुग्ण हे स्वाईन फ्लूचे असून ग्रामीणमध्ये 82 असे एकूण 211 रुग्णांची नोंद झाली. सध्या शहरातील 42, ग्रामीणमधील 57 रुग्ण मिळून, 99 रुग्ण उपचार घेत असून, सध्या 4 गंभीर आहेत. तेच नव्याने झालेल्या बैठकीत मृत्यूच्या विश्लेषण अहवालानुसार शहातील 3, ग्रामीणमधील 1 मध्य प्रदेशातील शिवनीतील 1 अशा एकूण 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूमध्ये शहरातील 85 वर्षीय वयोवृद्ध ग्रामीण भागातील 31 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यूचे अहवाल प्रतीक्षेत स्वाईन फ्लूची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. पण, योग्य वेळी रुग्णालायत दाखल करून घेत अतिधोक्याची पातळी टाळता येऊ शकते. यामध्ये यापूर्वी कोरोनाची लागण झालेल्यांनाही स्वाईन फ्लूचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे आजारपण असल्याने दुर्लक्ष न करता वेळीच आरोग्यची काळजी घेत तपासणी करीत उपचार सुरू करण्याचे आवाहन केले जात आहे. नागपूर जिल्ह्यातील ४ वर्षीय मुलीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी काही तपासण्या केल्या असता नकारात्मक आहे. त्यामुळे तिचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.
10 जणांचा मृत्यूमध्ये 2 नागपूर जिल्ह्याबाहेरील
आरोग्य विभागाकडून दर आठवड्याला स्वाईन फ्लूने संशयित, मृत्यूच्या रुग्णाचे डेथ ऑडिट केले जाते. यात आतापर्यंत झालेल्या मृत्यूमध्ये 6 जण नागपूर शहरातील तर २ ग्रामीण भागातील इतर जिल्हे तथा बाहेर राज्यातील 2 अशा 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बैठकीत इतर 3 दगावलेल्या रुग्णांमध्ये एकूण 10 रुग्णांचा मृत्यूचे कारण स्वाईन फ्लू असल्याचे समोर आले आहे.
स्वाईन फ्लूच्या बचावासाठी काळजी घ्या
वेळोवेळी हात सातत्याने साबण व पाण्याने धुवत राहावेत. लोकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. स्वाईन फ्लू रुग्णापासून सामाजिक अंतर ठेवावे. खोकलताना आणि शिंकताना तोंडाला रुमाल लावून आजार पसरणार नाही याची काळजी घ्यावी. दिवसभर भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी, पौष्टीक आहार घ्यावा. पण, कोरोनाप्रमाणेच काही बाबी टाळाव्यात असाही वैद्यकीय सल्ला दिला जात आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टपर्यंत 1600 हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. तर 49 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी, 387 प्रकरणे होती तर दोन मृत्यू झाले होते. परंतु H1N1 बहुतेक उच्च कोविड घटनांमुळे पार्श्वभूमीवर होते.