ETV Bharat / city

नागपुरात शॉर्टसर्किटमुळे स्टार बस जळून राख; प्रवासी सुखरुप

author img

By

Published : May 28, 2019, 1:35 PM IST

हिंगणा येथून सीताबर्डी येथे जाण्याकरिता निघालेली नागपूर महानगर परिवहन सेवेची बस आज सकाळी शॉटसर्किटमुळे जळाली.

जळालेली बस

नागपूर - हिंगणा परिसरात नागपूर महानगर परिवहन सेवेच्या चालत्या स्टार बसमध्ये शॉटसर्किट होऊन आग लागली. यावेळी ड्रायव्हरने प्रसंगावधान राखल्यामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला.

बसला लागलेली आग

नागपूर महानगर परिवहन सेवेची बस आज सकाळी हिंगणा येथून सीताबर्डी येथे जाण्याकरिता निघाली. यावेळी बस मध्ये फारसे प्रवासी नव्हते. बस काही अंतरावर गेल्यानंतर बसच्या समोरील भागातून धूर निघताना दिसताच बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवून बस मधील प्रवाशांना खाली उतरले. बस चालकाने स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, आग विझण्याऐवजी आणखीच भडकल्याने क्षणात संपूर्ण बस जळून राख झाली आहे.

बसला आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र, तोपर्यंत ही बस जळून खाक झाली होती. सध्या नागपूरात ४७ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्याने शहरात आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. तर दुसरीकडे पालिकेच्या बसेसची अवस्था वाईट झाल्यामुळे आगीच्या घटनेला कारणीभूत ठरत आहेत.

Intro:नागपूरच्या हिंगणा परिसरात नागपूर महानगर परिवहन सेवेच्या चालत्या स्टार बस मध्ये शॉट सर्किट होऊन आग लागली, प्रसंगावधान राखत ड्रायव्हर सहित प्रवाश्यांनी बस रिकामी केल्याने मोठा अनर्थ टळला,अग्निशामक दलाने वेळेवर पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने बस पूर्ण पणे जाळून राखा झाली आहे Body:स्थानिक लोकांच्या माहिती नुसार आज सकाळी हिंगणा येथून सीताबर्डी येथे जाण्याकरिता नागपूर महानगर परिवहन सेवेची बस निघाली होती....सकाळची वेळ असल्याने बस मध्ये फारसे प्रवासी नव्हते... बस काही अंतरावर गेल्या नंतर बसच्या समोरील भागातून धूर निघताना दिसताच बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवून बस मधील प्रवशांना खाली उतरले ...बस चालकाने स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र आग विझण्या ऐवजी आणखीच भडकल्याने क्षणात संपूर्ण बस जळून राख झाली आहे....बस ला आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन विभागांची गाडी देखील घटना स्थळी दाखल झाली होती....सध्या नागपुरात 47 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्याने शहरात आग लागण्याच्या घटना वाढल्या असताना दुसरी कडे महापालिकेच्या बसेसची भंगार सारखी झालेली अवस्था देखील आगीच्या घटने करिता कारणीभूत ठरत आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.