नागपूर - महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दिशा ही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून ठरते. विदर्भाच्या दौऱ्यावर असताना खासदार राऊत यांची विशेष मुलाखत ईटीव्ही भारतच्या ( Sanjay Raut Exclusive interview Etv ) प्रतिनिधीने घेतली आहे.
प्रश्न- विदर्भाची जबाबदारी तुम्हाला दिली आहे. विदर्भ भाजपचा गड राहिला आहे. याला शिवसेनेचे गड बनवण्याची ही तयारी आहे का?...
उत्तर - जरी शिवसेनेचा आमदार नसला तरी विदर्भात सेनेचे फार मोठी ताकद आहे. मी गेल्या तीन दिवसांपासून पाहतो आहे. शिवसेनेच्या नावाने अजूनही लोकांच्या अंगावर रोमांच उभा राहतो. लोक येत आहेत. भेटत आहेत. पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागू म्हणून सांगत आहेत.
प्रश्न - रामटेक लोकसभा मतदार संघात सेनेचा मोठा मतदार आहे, तिथे न जाता चंद्रपूरला न जाता सर्व बैठका नागपुरातच घेतल्या....
उत्तर - नागपूर राजधानीचे शहर आहे. इथूनच सगळे घडते. परत आठ दिवसाने येत आहे. तेव्हा संपूर्ण ग्रामीण भागात प्रत्येक मतदार संघात फिरेल तिथून चंद्रपूरलाही जाईल.
प्रश्न - ईडीच्या कारवाई सुरू आहेत. मुख्यमंत्री यांच्या घरापर्यंत म्हणजे त्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचली आहे. काय सांगाल...
उत्तर - जिथे भारतीय जनता पक्षाचे सरकार बनू शकले नाही. तिथे केंद्रीय तपास यंत्रणाचे गैरवापर करून सरकार खिळखिळे करायची दबावाखाली आणायची, अशा प्रकारचे घाणेरडे व दळभद्री राजकारण सुरू आहे. दळभद्री राजकारणाला पुरून उरू.
प्रश्न - तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नाव न घेता पुतीन यांच्याशी केली. मिसाईल हल्ले हुकविले आहे, पुढच्या काळात असेच हल्ले होत राहिले तर त्याला तुम्ही कसे उत्तर द्याल...
उत्तर - करू द्या न हल्ले. उत्तर देऊच, जनतेला कळते कसे राजकारण चाललेले आहे. आम्ही काही झुकणारे लोक नाहीत.
प्रश्न -तुम्ही अनेक मुलाखती घेतल्या आहेत. त्या मुलाखती गाजल्या आहेत. देवेंद्र फडणविस यांची 2020 मुलाखत घेतली होती. तेव्हा ती प्रकाशित झाली नाही.
उत्तर - मुलाखत घेऊ ना, आमचा मनामध्ये असे काही जळमट नसतात. आमचे खुल मन आहे. खुले हृदय आहे, करू.
प्रश्न - राजकारणात कधीही काही घडू शकते. भविष्यात कधी पुन्हा दोन्ही पक्षात मित्रत्वाचे संबंध होऊ शकेल का?
उत्तर - त्यासाठी नाते जपावे लागते. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने सध्याचे वातावरण भाजपने तयार केले आहे, हिंदुस्थानात पाकिस्तानसारखे वातावरण होत आहे. त्यामुळे भविष्यात दृष्टीपथात एकत्र येण्याचे चिन्ह काही दिसत नाही.
येत्या काळात सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण पाहता भविष्यात युती होईल, असे कुठलेही चित्र नाही, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut on alliance with BJP ) यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत करताना सांगितले.