ETV Bharat / city

Liquor Store Robbery : कॅशिअरला मारहाण करत तळीरामांनी दारूच्या दुकानाची केली लूट; घटना सीसीटीव्हीत कैद

दारूच्या दुकानातील कॅशिअरला मारहाण ( Beating Cashier in Local Liquor Store ) करून हजारो रुपायांसह दारूच्या बाटल्या पळवल्याची घटना नागपूर शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या ( Sakkarada Police Station ) हद्दीतील आशीर्वाद नगर येथे घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ( Incident Captured on CCTV camera ) झाली आहे.

Liquor Store Robbery
Liquor Store Robbery
author img

By

Published : Dec 5, 2021, 3:59 PM IST

Updated : Dec 5, 2021, 4:30 PM IST

नागपूर - दारू पिण्यासाठी आलेल्या चार तळीरामांनी देशी दारूच्या दुकानातील कॅशिअरला मारहाण ( Beating Cashier in Local Liquor Store ) करून हजारो रुपायांसह दारूच्या बाटल्या पळवल्याची घटना नागपूर शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या ( Sakkarada Police Station ) हद्दीतील आशीर्वाद नगर येथे घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ( Incident Captured on CCTV camera ) झाली आहे. ज्याच्या आधारे सक्करदरा पोलिसांनी अवघ्या काही तासात चारही आरोपींना अटक केली आहे. अटक झालेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

माहिती देतांना पोलीस अधिकारी

नागेश टेकाम उर्फ नाग्या आणि मुसा नामक दोन तळीराम आशीर्वाद नगरीतील अमोल कंट्री लिकर शॉपमध्ये दारू पिण्यासाठी नेहमीच येत होते. त्यामुळे दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची ओळख होती. दोन डिसेंबरच्या दिवशी दुपारी नागेश आणि मुसा अन्य दोन साथीदारांसह दुकानात आले. त्यांनी दारू देखील खरेदी केली. त्याच वेळी कॅशिअरच्या कॅबिनचे दार उघडले असल्याचे लक्षात येताच चारही आरोपींनी कॅशिअरच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून कॅशिअरला मारहाण करण्यात सुरुवात केली. यावेळी आरोपींनी गल्ल्यातील हजारो रुपायांसह दारूच्या बाटल्या घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती समजताच सक्करदरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली आहे.

पार्टी अर्ध्यावरच सोडावी लागली -

अमोल कंट्री लिकर शॉपमध्ये लूटमार केल्यानंतर आरोपींनी शहराच्या बाहेर पळून जाण्यासाठी एका ऑटो रिक्षाचा उपयोग केला. त्याआधी आरोपींनी लुटलेल्या पैशातून नवीन कपडे आणि पार्टी करण्यासाठी कोंबडी विकत घेतली. पार्टी रंगात आली असताना पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. महत्वाचे म्हणजे ज्या ऑटो-रिक्षाने आरोपी पळाले होते. त्याच्या चालकाने पोलिसांनी या आरोपींच्या ठिकाणाची माहिती दिली.

हेही वाचा - Fake Notes Fraud Case : नागपुरात मनोरंजन बँकेच्या खोट्या नोटा देऊन मित्रानेच केली मित्राची फसवणूक

Last Updated : Dec 5, 2021, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.