नागपूर - उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाचे उद्रेक कायम आहे. रोज हजार पार असणारी कोरोनाची रुग्णसंख्या आता 2 हजाराच्या पुढे जाऊन पोहचली आहे. याच धर्तीवर कोरोनाची रुग्णसंख्या पाहता 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. शनिवारी 2261 कोरोना बधितांची भर पडली. यात सात जणांचा मृत्यू झाला असून पूर्व विदर्भातही 2719 बाधित मिळून आले. तर 14 जणांचा मृत्यू आहे.
आतापर्यंत 4 हजार 447 जणांचा मृत्यू-
नागपुर जिल्ह्यात 11 हजार 19 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात यामध्ये नागपूर शहरात 1844 नवे रुग्ण असून ग्रामीण भागात 415 रुग्ण मिळून आले. यात 2 शहरात, 2 बाहेर जिल्ह्यातील तर 3 ग्रामीण भागातील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही 15 हजार 423 आहे. तसेच आतापर्यंत 4 हजार 447 जणांचा मृत्यू झाला आहे. तेच 1 लाख 68 हजार 250 जण आतापर्यंत बाधित झाले आहेत.
कडक निर्बंध लादत संचार बंदी-
नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतीवर असल्याने मिनी लॉकडाऊन करून आटोक्यात न आल्याने दैनंदिन मिळणारे रुग्ण वाढत गेले. सुरवातीला 1 हजार रुग्ण मिळत असताना हळूहळू या आठवडयात ही संख्या 2 हजाराचा घरात जाऊन पोहचली. यामुळे कडक निर्बंध लादत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे नागरपूर शहरात सोमवार 15 मार्चपासून विनाकारण रस्त्यावर फिरल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्येही अत्यावश्यक सेवा आणि लसीकरण मोहीम सुरूच राहणार आहे. सीमाबंदी करत साखळी तोडण्याच्या प्रयत्न केला जाणार आहे.
पॉझिटिव्ह रुग्णाचा दर 13. 15 इतका-
नागपूर जिल्ह्यात 2 हजार 719 रुग्ण बाधित असून 1 हजार 22 जणांना सुट्टी देण्यात आली. भंडारा 65, चंद्रपूर 104, गोंदिया 15, वर्धा 251, गडचिरोलीत 23 जनांची नोंद झाली आहे. तेच पूर्व विदर्भात 1 हजार 235 जण कोरोना मुक्त झाले आहे. नागपूरात 7 जण, वर्ध्यात 6 जण तर चंद्रपूर जिल्ह्यात 1 असे 14 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 23 हजार 91 जण कोरोनातून बरे झाले. यात सध्याच्या पॉझिटिव्ह रुग्णाचा दर 13. 15 इतका आहे. नागपूरत आणि वर्ध्यात हा दर 10 अंशाच्या वर आहे.
हेही वाचा- लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका, हॉटेल चालकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा अखेरचा इशारा