ETV Bharat / city

शत्रूला उत्तर देण्यात लष्कर प्रमुख मनोज पांडे माहीर - सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम

author img

By

Published : May 1, 2022, 11:28 AM IST

कुशाग्रह आणि हुशार अशी ओळख असलेले मनोज पांडे ( Anil Bam on army chief General Manoj Pande ) यांच्या समोर सध्याच्या परिस्थितीत काय आव्हाने असणार ( General Manoj Pande news ) याबाबत लष्करातील सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांच्याकडून जाणून घेतले.

Anil Bam on army chief General Manoj Pande
मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख अनिल बम प्रतिक्रिया

नागपूर - नागपूरचे सुपुत्र मनोज पांडे यांनी आज लष्करप्रमुखपदाचा पदभार ( Anil Bam on army chief General Manoj Pande ) स्वीकारला. नागपूरकरांसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा दिवस आहे. जनरल मनोज नरवणे यांच्याकडून मनोज पांडे यांनी पदभार स्वीकारला. कुशाग्रह आणि हुशार अशी ओळख असलेले मनोज पांडे ( General Manoj Pande news Nagpur ) यांच्या समोर सध्याच्या परिस्थितीत काय आव्हाने असणार याबाबत लष्करातील सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम ( Retired Major General Anil Bam news Nagpur ) यांच्याकडून जाणून घेतले.

माहिती देताना सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम

हेही वाचा - Young Suicide in Nagpur : बेरोजगारीला कंटाळून इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

भारतीय लष्कर हे जगात चौथ्या क्रमांकावर आहे. याचे प्रमुख म्हणून लष्कर प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. भारतीयांच्या रक्षणाची जबाबदारी त्याचावर असल्याने ते नक्कीच ही जबाबदारी कार्यकुशलतेणे सांभाळतील यात शंका नाही, असे सेवानिवृत्त मेजर जनरल बाम म्हणालेत.

लष्कर प्रमुख म्हणून अंतर्गत सुरक्षा हे सर्वात मोठे आव्हान आहे. ज्या पद्धतीने जम्मू काश्मीर खोऱ्यात असो की उत्तर पूर्व भागातील घडामोडी असो याचा पुरेपूर अभ्यास आणि या भागाची माहिती लष्कर प्रमुख मनोज पांडे यांना नक्कीच आहे. त्यांनी दुर्गम भागात महत्वाच्या पदावर कर्तव्य बजावले आहे. लेह लदाख, चीन, तसेच जम्मू काश्मीर, एलओसी या भागातील खडानखडा त्यांना माहीत आहे. त्यांच्यासोबत दोन वर्षे केल्याचेही सेवानिवृत्ती मेजर जनरल अनिल बाम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

जबाबदारी फत्ते करण्यात माहीर - इंनजिनियर म्हणून पाहिल्यांदाच लष्कराच्या मुख्यपदावर पांडे पोहचले आहेत. त्यांनी अनेक आव्हान तेव्हाच स्वीकारले होते जेव्हा त्यांनी जनरल कॅडर स्वीकारले होते. त्यामुळे, ते त्यांच्या कामात निपून आहे. त्यांना आतापर्यंत मिळालेल्या जबाबदाऱ्या पूर्ण होईपर्यंत ते शांत बसणार नाही, असाच त्यांचा स्वभाव आहे. तसेच, त्यांचा लष्करी आणि कर्तव्यावरील अनुभव दांडगा आहे. लेह लदाख परिसर असो की जमू कश्मीर या ठिकाणी वर्किंग स्ट्रॅटेजी उत्तम आहे. त्यांच्या बुद्धिकुशलतेला कुठेही तोड नाही, असे जनरल अनिल बम यांनी सांगितले.

चीन आणि पाकिस्तान भारतीय व्यवस्थेला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतात. पण, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे. तसेच, लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी पदभार स्वीकारल्याने ते शत्रूला तोंड देण्यासाठी तयार असल्याचीही भावना सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - विदर्भ शासन! महाराष्ट्र दिनी फलकांवर झळकले 'विदर्भ शासन'; महाराष्ट्र दिनाचा नोंदवला निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.