ETV Bharat / city

'कोरेगाव-भीमा प्रकरणाची CID मार्फत चौकशी व्हावी'

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण विभाग (CID) मार्फत करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे.

Anandraj Ambedkar
आनंदराज आंबेडकर
author img

By

Published : Feb 4, 2020, 6:24 AM IST

नागपूर - कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण विभाग (CID) मार्फत करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. नागपूर येथे आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला त्यावेळी त्यांनी हि मागणी केली.

रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांची प्रतिक्रिया....

हेही वाचा... कुणाल कामराची चक्क राज ठाकरेंना वडापावची 'लाच'...

कोरेगाव-भीमा प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी. राज्य सरकार चौकशी करत असताना केंद्राने हस्तक्षेप करायला नको. या प्रकरणात केंद्र सरकार संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला.

हेही वाचा... 'शाहीन बाग, जामियामधील सीएएविरोधी आंदोलन योगायोग नसून एक प्रयोग'

कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी केली. तसेच एल्गार परिषदेचा संबंध शहरी नक्षलवादाशी जोडणे चुकीचे असल्याचा दावा यावेळी आंबेडकरांनी केला.

हेही वाचा... नरवीर 'तान्हाजी मालुसरे' यांच्य‍ा कोंढाणा रणसंग्राम‍ाची ३५० वर्षपुर्ती

राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या विचारांची लोक एकत्रित आली. ही विचारांची युती नाही तर सत्तेसाठी झालेली युती आहे. ज्यामुळे राज्य सरकार स्थिर नाही तर अस्थिर अवस्थेत असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अनेक उद्योग बंद पडत आहे. रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न आपण पाहत आहोत. मात्र, परिस्थिती वेगळी आहे. अनेक घोषणा केल्या जात आहेत, पण प्रत्यक्षात काहीच नाही. हा सर्व प्रकार थांबवला पाहिजे. पंतप्रधानांनी मन की बात करण्यापेक्षा जन की बात करायला पाहिजे, असेही आनंदराज आंबेडकर यावेळी म्हणाले.

Intro:कोरेगाव-भीमा प्रकरणाची CID मार्फत चौकशी करावी, राज्य सरकार चौकशी करत असताना केंद्राने हस्तक्षेप करायला नको, या प्रकरणात केंद्र सरकार संभाजी भिडे आणि एकबोटे यांना वाचवण्याचं काम करते आहे, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केला, ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
Body:भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी केली... एल्गार परिषदेचा संबंध शहरी नक्षलवादाशी जोडने चुकीचे असल्याचाही दावा यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी केला... सोबतच त्यांनी राज्य सरकार मध्ये वेगवेगळ्या विचारांची लोक एकत्रित आली ही विचारांची युती नाही तर सत्ते साठी झालेली युती आहे, ज्यामुळे राज्य सरकार स्थिर नाही, अस्थिर अवस्थेत आहे असंही ते म्हणाले... देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे, उद्योग बंद पडत आहे , रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला . आर्थिक महासत्ता बनण्याचं स्वप्न आपण बघतो मात्र परिस्थिती वेगळी आहे ,घोषणा केल्या जात आहे होत काहीच नाही हे आता थांबवलं पाहिजे पंतप्रधानांनी मन की बात करण्यापेक्षा जन की बात करायला पाहिजे असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.

बाईट - आनंदराज आंबेडकर (नेते, रिपब्लिकन सेना)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.