ETV Bharat / city

Vehicle Burning Incidents : वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागण्याची शक्यता टाळण्यासाठी वाचा 'या' टिप्स - उन्हाळ्यात वाहनांची काळजी कशी घ्यायची

नागपूर महानगरपालिकेच्या आपली बस सेवतील तीन वाहनाने मागे पेट घेतला होता. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता, ज्यामुळे वाहनांची काळजी घेण्यासाठी परिवहन विभागाने आवाहन केले आहे. या उन्हाळ्यात वाहनांची काळजी कशी घ्यायची जाणून घेऊया.

Vehicle
Vehicle
author img

By

Published : May 10, 2022, 8:08 PM IST

नागपूर: यंदा विदर्भात तापमानाचा पारा 45 अंश पार एप्रिल महिन्यातच जाऊन पोहचला आहे. या परिस्थितीत वाहन चालवताना अचानक पेट घेण्याच्या घटना ही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. तसेच नागपूर महानगरपालिकेच्या आपली बस सेवतील तीन वाहनाने पेट घेतला होता. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता, ज्यामुळे वाहनांची काळजी घेण्यासाठी परिवहन विभागाने आवाहन केले आहे. या उन्हाळ्यात वाहनांची काळजी कशी घ्यायची जाणून घेऊ या विशेष वृत्तांतातून....

तुमच्याकडे कार अथवा दुचाकी असेल आणि तुम्ही 45 अंश तापमानात बाहेर पडत असाल, तर कार चालवण्यापूर्वी नीट काळजी घ्या. या उन्हात केव्हा वाहनात छोटासा बिघाड होईल आणि वाहन पेट घेईल याचा नेम नाही. त्यामुळेच परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी रवींद्र भुयार ईटीव्ही भारतशी बोलतांना काही खास टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्सचे जर तुम्ही पालन केले, तर नक्कीच आग लागण्याचा घटना टाळता येऊ शकतात असेही ते म्हणालेत.

वाहनांना आग लागण्याची शक्यता टाळण्यासाठी वाचा 'या' टिप्स

अशी घ्या काळजी, चेक लिस्टमध्ये ठेवा या बाबी - सध्या तापमान वाढले आहे, यात आगीच्या घटना वाढल्या आहेत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे इंधनाची गळती, इंजिन ऑइलची गळती, तसेच वायर हे कुरतडलेले असणे असे काही कारण समोर येतात. त्यामुळे त्यात प्रथम टायरची तपासणी करून घेणे, बोनेट उघडून त्यात काही स्पार्क होत तर नाही ना, हे तपासून घ्यावे. यात गाडीच्या डॅशबोर्डवरील स्क्रीनवर काही चिन्हांकित सिग्नल दिसतात. ते तपासून घ्यावे, पण या बाबींची अनेकांना समज नसते. हे समजून घेण्यासाठी माहिती पुस्तीका, किंवा ऑनलाईन त्या मॉडेलची माहिती उपलब्ध असते ते तपासून घ्यावेत.

समन्वय समितीची बैठक पडली पार - नागपूर मनपाच्या वतीने आपली बससेवेच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक सोयीसुविधा दिली जाते. पण याच बसमध्ये मागील दोन महिन्यात तीन वेळा आग लागून पेट घेतल्याची घटना घडल्याने हा प्रवास जीवघेना ठरत आहे. त्यामुळे या घटना टाळण्यासाठी विशेष उपाययोजना केली जात आहे. यासाठी आरटीओ आणि मनपाच्या परिवहन विभागाकडून यासाठी चेक लिस्ट तयार केली आहे.

वाहन चालकाने गाडी चालवण्यापूर्वी तांत्रिक तपासणी करून घेणे. टायर्ससह संपूर्ण गाडीची वायरिंग तपासून घेणे, वाहन चालकांने प्रवाशी असताना आग लागल्यास काय करावे, कसे स्वतः घाबरून न जाता योग्य निर्णय घेण्यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही बैठकीत ठवरण्यात आले. ड्रायव्हरने काय करावे याची चेकलिस्ट तयार करण्यात येईल. तसेच सात दिवसात वरिष्ठ अधिकारी यांनीही तपासणी करावी. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात एक टेक्निकल टीम आरटीओ विभागाकडून तपासणी होईल असे नियोजन पुढील घटना टाळण्यासाठी केले जाणार आहे.

आपली बस सेवेतील वाहनं का पेट घेतात? नागपूर मनपाच्या बस पेट घेतात, त्या तुलनेत परिवहन महामंडळच्या बसला तापमानमुळे आग लागल्याचे कळत नाही. तेच त्यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणा असते. जे जबाबदारीने तपासतात. मनपाच्या कंत्राटदाराकडे तशी फारशी यंत्रणा नसते. त्यामुळे यावर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आरटीओ पथकाच्या माध्यमातून अश्या घटना वारंवार का घडतात याचाही शोध घेणार असल्याचेही उपप्रदेशिक परिवहन अधिकारी यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले.

हेही वाचा - Navneet Rana Children : '...त्यात कोणता गुन्हा केला', आरोहीचा सवाल; नवनीत राणांची मुले नागपूरहून दिल्लीकडे रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.