नागपूर - काश्मीरमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधासाठी कायदे नव्हते, बाल विवाह प्रतिबंधन असे अनेक कायदे नव्हते. मात्र, ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर मध्ये हे सर्व कायदे लागू झालेत, अशी माहिती केंद्रीय कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी नागपुरात दिली. केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय काश्मीरच्या सामान्य जनतेच्या हिताचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या कुठल्याही आरोपावर मी टिप्पणी करू इच्छित नाही. मात्र, पाकिस्तानकडून कुठल्याही दहशतवादी हालचाली करण्यात आल्या तर त्याचे भारताकडून सडेतोड उत्तर दिले जाईल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाच्या सुरक्षेकडे सतर्कतेने लक्ष दिले जात आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली. राज्य विधी न्याय मंडळ प्राधिकरणाच्या अखिल भारतीय परिषदेत ते उपस्थित होते.