ETV Bharat / city

जागतिक मातृभाषा दिन विशेष: स्वतःमधील प्रतिभा सिद्ध करण्याची ताकद मातृभाषेतच

आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढलेले आहे. या सगळ्यात स्वतःची मातृभाषा किंवा मराठी भाषा मागे पडताना दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे स्वतःच्या भाषेबद्दल मनात असलेला न्यूनगंड आहे.

प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे
प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे
author img

By

Published : Feb 21, 2021, 8:27 PM IST

Updated : Feb 21, 2021, 10:29 PM IST

नागपूर - आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढलेले आहे. या सगळ्यात स्वतःची मातृभाषा किंवा मराठी भाषा मागे पडताना दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे स्वतःच्या भाषेबद्दल मनात असलेला न्यूनगंड आहे. पण स्वतःची प्रतिभा सिद्ध करताना नव निर्मिती करण्याची ताकद मातृभाषेतून मिळते, असे अनेक शास्त्रज्ञ सांगत असल्याचे मत रातूम नागपूर विद्यापीठाचे मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.

प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे
मुनघाटे यांनी भाषा संस्कृती, भाषेतील शब्द, त्यामागे असलेली संस्कृती परंपरा याचे नाते कसे असते, हे सांगितले. साहित्य अकादमीचे केंद्रीय समिती सदस्य, समीक्षक, आदिवासी साहित्याचे अभ्यासक, समकालीन साहित्य चळवळीचे भाष्यकार अशी मुनघाटे यांची ओळख आहे.मातृभाषा आणि प्रतिभा याचा जवळचा संबंध आहे. कारण एखाद्या विषयाचे आकलन करताना जितके सोप्या आणि उत्तम पद्धतीने आकलन हे मातृभाषेतुन होते. तितके ते इतर भाषेतून होत नाही. शिक्षण घेतांना अनेक विषय हे दुसऱ्या भाषेतून शिकताना विद्यार्थ्यांना अडचणीना समोर जावे लागते. पण तेच स्वतःच्या मातृभाषेतून अवगत करण्याचा प्रयत्न केल्यास अधिक चांगल्या पद्धतीने त्यातील संकल्पना समजून घेता येऊ शकेल. मग तो विषय गणित असो की भौतिक शास्त्र इतर कोणताही कठीण वाटणारा विषय.
स्वतःची मातृभाषा अवगत केल्या शिवाय दुसरी भाषा अवगत करता येत नाही-
स्पर्धेच्या जगात इतर भाषा किंवा इंग्रजी भाषा ही व्यवहार करताना शिकावीच लागेल. पण दुसरी भाषा शिकताना स्वतःची मातृभाषा अवगत केल्या शिवाय दुसरी भाषा शिकू शकत नाही. जन्मानंतर शिकलेली मातृभाषा त्यातील शब्द, त्या भाषेतील कथा, परंपरा संस्कृती हे आत्मसात होत नाही तोपर्यंत समोर जाता येणार नाही.
जैविक साखळीतील घटकाप्रमाणे भाषेतील शब्दांचे महत्व-

पृथ्वीवरील जैविक साखळीत ज्या पद्धतीने प्रत्येक घटकांचे महत्व असते. एखादा घटक नसल्यास मानवी अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच भाषेच्या बाबतीत शब्दाच्या बाबतीत पाहायला मिळत असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. आपण भाषेबद्दल अस्मिता बाळगतो, महत्व सांगतो म्हजेच ती भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचे महत्व त्यातून व्यक्त होत असते. त्यांचे जिवन, अस्तित्व त्यासोबत जुडून असते. जितक्या भाषा असतील तेवढी विविधता असते सांस्कृतिक एकात्मता असते.

भाषेतील शब्द केवळ शब्द नसून जगण्यातील शब्द असतात-

भाषेतील शब्द त्या भाषेच्या संस्कृतीची एक प्रकारे गोळा बेरीज असते. त्या भाषेचा सारांश असतो. भाषेतील शब्द म्हणजे शब्दकोशातील शब्द नसून जगण्यातील शब्द असतात. कवी ग्रेस यांच्या "अंगणात जमले मजला...संपले बालपण माझे" या कवितेतील 'अंगण' हा शब्द आहे. यात आजच्या सिमेंटच्या जंगलात अंगण हा शब्द म्हणजे घरासमोरील मोकळी जागा असा वाटेल. पण इथे अंगण म्हणजे जगण्यातली अनेक गोष्टी त्यात आहेत. अंगण म्हणजे शेणाने सारवलेले, रांगोळी काढलेले, तुळशी वृंदावन, रात्रीच्या वेळी चांदण्याच्या प्रकाशात रंगलेल्या गप्पा गोष्टी, हे सर्व अंगण एका शब्दात येतात.

अंगण शब्द नष्ट झाल्यास किंवा शब्दकोशात राहिल्यास घरासमोरील मोकळी जागा असाच अर्थ कोणीही घेईल. प्रत्येक भाषेचे वैशिष्ट्य असते प्रत्येक समाज ते वैशिष्ट्य घेऊन जगतो. त्या समूहाची एकप्रकारे ओळख त्या मातृभाषेतून दिसून येते.

पण घरात मराठीत बोला-

सर्वत्र वाढते इंग्रजी भाषेचे वर्चस्व, व्यवहार असो की आंतरराष्ट्रीय कामकाज, सर्व ठिकाणी इंग्रजी भाषेने पकड निर्माण केली आहे. त्यामुळे इतरांना शरण जाऊन का होईना भाषा शिकावी लागते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतासह अनेक देशात अनेक भाषा आज बोलल्या जातात. पण इंग्रजी भाषा मोठी होण्यामागे त्या भाषा बोलणाऱ्यांनी त्या भाषेचे साम्राज्य उभे केले. त्यामुळे त्या भाषेचे द्वेष करून चालणार नाही. तर ती भाषा शिकावी लागणार आहे. ते स्वीकारतांना केवळ मराठी अस्मिता बाळगून होणार नाही. मुलाला इंग्रजी शाळेत टाका पण घरात मराठी भाषाही बोलली गेली पाहिजे यासाठी मराठी भाषा जतन झाली पाहिजे.

मराठी भाषा बोलणारे इतर भाषेचे अतिक्रमण मान्य करतात-

आपल्याला आपल्या भाषेचा न्यूनगंड बाळगून चालणार नाही. आपण बरेचदा समूहात असताना त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. मेंदूत भाषेचे केंद्र असते. व्यक्तीच्या जैविक निर्मितीमध्ये परंपरेने बोली भाषेत सामर्थ त्याच्या मेंदूत असते. त्याला नवीन निर्मित करण्याची ताकद त्याच्या मातृभाषेत भाषेत असते. पण आजच्या काळात मराठी माणूस इतर भाषेचे अतिक्रम मान्य करतो, हे चुकीचे आहे. वर्षोनुवर्षे मराठी भाषा शिकून मराठीत अर्ज करता येत नसेल, सोशल माध्यमातून व्यक्त होताना संदेश लिहता येत नसेल, तर फारच दुर्दैवी गोष्ट असल्याचेही मत डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- अमरावती शहर आणि अचलपूर नगरपरिषद क्षेत्रात सात दिवसांची टाळेबंदी जाहीर

Last Updated : Feb 21, 2021, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.