नागपूर - महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती ( Power cut villages Maharashtra ) आज अंधारात गेल्या आहेत. स्ट्रीट लाईट ( Street light power cut villages Maharashtra ) आणि पाणी पुरवठ्याच्या विद्युत बिलाची 8 हजार कोटींची थकबाकी असल्याने विद्युत पुरवठा खंडित केला आहे. यासाठी येणाऱ्या अधिवेशनात बजेटमध्ये वित्त मंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री यांनी निधी देऊन ग्रामपंचायतचे ( villages power cut Maharashtra news ) वीजबिल भरावे अशी मागणी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule on power cut Maharashtra ) यांनी केली आहे. तेच राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी, हा विषय जिव्हारी लागला असून लवकरच राज्याचा मंत्री म्हणून यावर तोडगा काढू, अशी भूमिका घेतली. पण, जबाबदार मंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - Nitin Raut : 'दिल्लीतून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोना पसरला'
राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी तीन हजार कोटी रुपये निधी दिला जातो. त्या निधीतून ग्रामपंचायतचे स्ट्रीट लाईट आणि पाणी पुरवठ्याचे वीजबिल भरले जात होते. मात्र, मागील अडीच वर्षात सरकारने एकही रुपया न दिल्यामुळे 8 हजार कोटी रुपये ग्रामपंचायतवर थकबाकी झाली आहे. राज्यातील ग्रामपंचायतीची परिस्थिती पाहता हे वीजबिल भरू शकत नसल्यामुळे बजेटमध्ये निधी मंजूर करून वीजबिल भरावे, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
नागपूर जिल्ह्यातील सुमारे दोनशे ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटची वीजबिले थकीत असल्याने विद्युत कनेक्शन कापण्यात आले. यावर उत्तर देताना हा विषय नक्कीच जिव्हारी लागलेला असून प्रश्न लवकरच निकाली काढू, असे मत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती - नागपूर जिल्ह्यातील परिमंडळात पथदिव्यांच्या 7 हजार 394 कनेक्शनचे 142 कोटी रुपये थकीत आहे. तेच पाणीपुरवठा वीज कनेक्शनची संख्या 4 हजार 158 असून एकूण 50 कोटींची थकबाकी आहे. अशीच काहीशी परिस्थिती इतर भागातही पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणारा पावसाळी हंगाम पाहता तात्काळ यावर उपाययोजना करण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करून प्रश्न निकाली काढावा, अशीही मागणी ग्रामपंचायत स्तरावर होत आहे.
सरपंच रस्त्यावर उतरतील - यापूर्वीही वीज पुरवठा खंडित केल्याने राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचाना घेऊन आंदोलन केले होते. यावेळी मात्र या गेंड्याच्या कातडीच्या सरकारच्या विरोधात भाजप आंदोलन करणार नसून सरकारने यावर वेळीच लक्ष दिले नाही तर ग्रामपंचायतचे सरपंच रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
अपक्ष आमदारांचा आरोप खरा - राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदार आणि शिवसेनेचे अनेक आमदार विकास निधीच्या मुद्द्यावर प्रचंड नाराज आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री त्यांना मतदारसंघासाठी पैसे देत नाही. त्यामुळे, प्रचंड असंतोष आमदारांमध्ये आहे. पैसे दिल्याशिवाय निधी मिळत नाही, असा आरोप केला आहे. तो आरोप खरा आहे, असेही बावनकुळे म्हणाले.