ETV Bharat / city

राजकीय आतंकवाद हा पहिल्या स्थानावर - योगगुरू बाबा रामदेव

भारत देश हा ऋषींनी बनवला आहे. साधन आणि साध्य करण्याचे साधन वेगवेगळे असले तरी सर्वात मोठा धर्म हा मानवी कर्म आहे. आणि ते कर्म पवित्र असल्यास भारत देश हा नक्की प्रगती करू शकेल असेही बाबा रामदेव म्हणाले.

Baba raamdev
योगगुरू बाबा रामदेव
author img

By

Published : Oct 24, 2021, 10:19 PM IST

नागपूर - देशाला सर्वाधिक धोका राजकीय आतंकवाद पासून असल्याचे योगगुरू बाबा रामदेव म्हणाले. त्यासोबतच जातीय आतंकवाद, आर्थिक आतंकवाद, राजकीय आतंकवाद आणि मेडिकल आतंकवाद ही एक मोठी समस्या आहे. राजकीय आतंकवाद हा जातीय आतंकवादाच्या पुढे असून तो पहिल्या स्थानावर असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. जात पंथ संप्रदाय वेगळे असले तरी मानव धर्म मात्र एकच आहे. ते नागपुरातील एका दैनिकाच्या कार्यक्रमात बोलत होते.

योगगुरू बाबा रामदेव
राजकीय आतंकवाद हा पहिल्या स्थानावर
यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह, श्री श्री रविशंकर, माजी खासदार राजेंद्र दर्डा, विजय दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी धार्मिक गुरू उपस्थित होते.
कोरोनाने योग अभ्यासाचे महत्व पटवले भारत देश हा ऋषींनी बनवला आहे. साधन आणि साध्य करण्याचे साधन वेगवेगळे असले तरी सर्वात मोठा धर्म हा मानवी कर्म आहे. आणि ते कर्म पवित्र असल्यास भारत देश हा नक्की प्रगती करू शकेल असेही बाबा रामदेव म्हणाले.

देशभर रस्त्यांचे जाळे

देशभरात रस्त्याचे जाळे उभारून केलेल्या कामाचा कौतुक केले. यामुळे अनेक प्रवासातील तास कमी झाले असून पेट्रोल डिझेल वाचले आहे. दरवाढ हा वेगळा भाग आहे, अशी मिश्किली करत नितीन गडकरी यांचे कौतुक केले. कोरोनामुळे योगाभ्यासचे महत्व अधिक वाढले आहे. कोरोनामुळे माणूस घाबरत आहे. डेंग्यूच्या छोट्या मच्छरमुळे माणूस घाबरत आहे. त्यामुळे मच्छर मोठा की माणूस असे सांगताना योगाभ्यास महत्वाचा असल्याचे ते म्हणालेत.

सेक्युलर म्हणजे सर्वधर्म समभाव

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सेक्युलरचा अर्थ हा धर्मनिरपेक्ष असा होत नसून सर्वधर्म समभाव असा होतो. भारतीय संस्कृती विशेषतः आहे की त्यात नैसर्गिक पद्धतीने सर्वधर्म समभाव आहे. सर्व धर्माच्या विचाराचे, देवांचा सन्मान करणे हाच मानवधर्म आहे. सर्व धर्मातील चांगुलपणा एकत्र केल्यास त्याला मानव धर्म असे म्हटले जाते. यात धर्म म्हणजे शिक्षकास विचारले तर तो शिक्षकी धर्माचे पालन करत असे सांगेल पण शिक्षकी हा धर्म नसून त्याचा अर्थ कर्तव्याशी अभिप्रेत आहे.त्यामुळे भारतीय संस्कृती विचारधारा वेगवेगळी असून अनेकतेमध्ये एकता ही विशेषता आहे. त्यामुळे वेगवेगळे विचार जरी डोळ्यासमोर असले तरी राष्ट्रधर्म मात्र एक असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यावेळी म्हणालेत. रिकाम्यपोटी फिलॉसॉफी सांगितली जाऊ शकते. त्यामुळे भय भूक, दहशतवादमुक्त तसेच सुखी समृद्ध राष्ट्र निर्माण करण्याचे काम नक्कीच सरकारचे आहे, असेही ते म्हणाले.

भारताकडे विश्वगुरू बनण्याची ताकद
यात सर्व संत मार्गदर्शक या कार्यक्रमानिमित्ताने एकच गोष्ट सांगत आहे ते भलेही कपड्याचे रंग, त्यांच्या धर्माची उपासना वेगळी वाटत असेल. पण त्याच्या विचारांचा भावार्थ एकच आहे. हीच भारतीय संस्कृतीची ताकद असल्याने भारत हा विश्वगुरू बनण्याची ताकद ठेवतो. अशी भविष्यवाणी स्वामी विवेकानंदांनी केली आहे. भारतीय संस्कृती ही सांप्रदायिक नाही. संस्कारापासून उद्याच्या पिढीच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती करण्यासाठी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. आज ही धार्मिक परिषदेत पवित्र विचारांचा विचारांचा संगम पाहायला मिळत आहे.

धर्मगुरूंचे नेमके कर्तव्य काय
अनेक संपद्राय असणे हीच भारताची विशेषता आहे. कारण प्रत्येक संप्रदाय हा एक एका रत्नाप्रमाणे आहे. धार्मिक स्थळांमध्ये गंभीर वातावरणाऐवजी आनंदी वातावरण असले पाहिजे. तसेच पवित्र आणि प्रसन्न वातावरण असले पाहिजे. कारण अशा वातावरणात प्रेम असते आणि जेथे प्रेम असेल तेथे ईश्वर असतो. यामुळे धर्म वेगळा असला तरी सर्वाना जोडणार आहे. आपापसातील वैमनस्य हे आपण धार्मिक ताकदीने बदलू शकतो.

हेही वाचा - आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : पैशांची मागणी झाल्याचा संजय राऊतांचा ट्विटरवरून आरोप

नागपूर - देशाला सर्वाधिक धोका राजकीय आतंकवाद पासून असल्याचे योगगुरू बाबा रामदेव म्हणाले. त्यासोबतच जातीय आतंकवाद, आर्थिक आतंकवाद, राजकीय आतंकवाद आणि मेडिकल आतंकवाद ही एक मोठी समस्या आहे. राजकीय आतंकवाद हा जातीय आतंकवादाच्या पुढे असून तो पहिल्या स्थानावर असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. जात पंथ संप्रदाय वेगळे असले तरी मानव धर्म मात्र एकच आहे. ते नागपुरातील एका दैनिकाच्या कार्यक्रमात बोलत होते.

योगगुरू बाबा रामदेव
राजकीय आतंकवाद हा पहिल्या स्थानावर
यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह, श्री श्री रविशंकर, माजी खासदार राजेंद्र दर्डा, विजय दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी धार्मिक गुरू उपस्थित होते. कोरोनाने योग अभ्यासाचे महत्व पटवले भारत देश हा ऋषींनी बनवला आहे. साधन आणि साध्य करण्याचे साधन वेगवेगळे असले तरी सर्वात मोठा धर्म हा मानवी कर्म आहे. आणि ते कर्म पवित्र असल्यास भारत देश हा नक्की प्रगती करू शकेल असेही बाबा रामदेव म्हणाले.

देशभर रस्त्यांचे जाळे

देशभरात रस्त्याचे जाळे उभारून केलेल्या कामाचा कौतुक केले. यामुळे अनेक प्रवासातील तास कमी झाले असून पेट्रोल डिझेल वाचले आहे. दरवाढ हा वेगळा भाग आहे, अशी मिश्किली करत नितीन गडकरी यांचे कौतुक केले. कोरोनामुळे योगाभ्यासचे महत्व अधिक वाढले आहे. कोरोनामुळे माणूस घाबरत आहे. डेंग्यूच्या छोट्या मच्छरमुळे माणूस घाबरत आहे. त्यामुळे मच्छर मोठा की माणूस असे सांगताना योगाभ्यास महत्वाचा असल्याचे ते म्हणालेत.

सेक्युलर म्हणजे सर्वधर्म समभाव

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सेक्युलरचा अर्थ हा धर्मनिरपेक्ष असा होत नसून सर्वधर्म समभाव असा होतो. भारतीय संस्कृती विशेषतः आहे की त्यात नैसर्गिक पद्धतीने सर्वधर्म समभाव आहे. सर्व धर्माच्या विचाराचे, देवांचा सन्मान करणे हाच मानवधर्म आहे. सर्व धर्मातील चांगुलपणा एकत्र केल्यास त्याला मानव धर्म असे म्हटले जाते. यात धर्म म्हणजे शिक्षकास विचारले तर तो शिक्षकी धर्माचे पालन करत असे सांगेल पण शिक्षकी हा धर्म नसून त्याचा अर्थ कर्तव्याशी अभिप्रेत आहे.त्यामुळे भारतीय संस्कृती विचारधारा वेगवेगळी असून अनेकतेमध्ये एकता ही विशेषता आहे. त्यामुळे वेगवेगळे विचार जरी डोळ्यासमोर असले तरी राष्ट्रधर्म मात्र एक असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यावेळी म्हणालेत. रिकाम्यपोटी फिलॉसॉफी सांगितली जाऊ शकते. त्यामुळे भय भूक, दहशतवादमुक्त तसेच सुखी समृद्ध राष्ट्र निर्माण करण्याचे काम नक्कीच सरकारचे आहे, असेही ते म्हणाले.

भारताकडे विश्वगुरू बनण्याची ताकद
यात सर्व संत मार्गदर्शक या कार्यक्रमानिमित्ताने एकच गोष्ट सांगत आहे ते भलेही कपड्याचे रंग, त्यांच्या धर्माची उपासना वेगळी वाटत असेल. पण त्याच्या विचारांचा भावार्थ एकच आहे. हीच भारतीय संस्कृतीची ताकद असल्याने भारत हा विश्वगुरू बनण्याची ताकद ठेवतो. अशी भविष्यवाणी स्वामी विवेकानंदांनी केली आहे. भारतीय संस्कृती ही सांप्रदायिक नाही. संस्कारापासून उद्याच्या पिढीच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती करण्यासाठी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. आज ही धार्मिक परिषदेत पवित्र विचारांचा विचारांचा संगम पाहायला मिळत आहे.

धर्मगुरूंचे नेमके कर्तव्य काय
अनेक संपद्राय असणे हीच भारताची विशेषता आहे. कारण प्रत्येक संप्रदाय हा एक एका रत्नाप्रमाणे आहे. धार्मिक स्थळांमध्ये गंभीर वातावरणाऐवजी आनंदी वातावरण असले पाहिजे. तसेच पवित्र आणि प्रसन्न वातावरण असले पाहिजे. कारण अशा वातावरणात प्रेम असते आणि जेथे प्रेम असेल तेथे ईश्वर असतो. यामुळे धर्म वेगळा असला तरी सर्वाना जोडणार आहे. आपापसातील वैमनस्य हे आपण धार्मिक ताकदीने बदलू शकतो.

हेही वाचा - आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : पैशांची मागणी झाल्याचा संजय राऊतांचा ट्विटरवरून आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.