ETV Bharat / city

परदेशातून नागपुरात आलेल्या 30 प्रवाशांचा शोध घेण्यात मनपाला अपयश, आता पोलिसांकडे जबाबदारी

ओमायक्रॉनचा (Omicron Variant Nagpur) धोका वाढल्यानंतर परदेशातून नागपुरात आलेल्या प्रवाशांवर (NMC Watch International Travellers) महानगरपालिकेने विशेष लक्ष केंद्रीय केले आहे. तरी देखील १७५ पैकी ३० प्रवाशांचा शोध लागत नाही. त्यामुळे या प्रवाशांना शोधण्याची जबाबदारी आता नागपूर पोलिसांना (Nagpur Police) देण्यात आली आहे.

author img

By

Published : Dec 7, 2021, 6:56 PM IST

nagpur airport
नागपूर विमानतळ

नागपूर - राज्यात ओमायक्रॉनचा (Omicron Variant Nagpur) धोका वाढल्यानंतर परदेशातून नागपुरात आलेल्या प्रवाशांवर (NMC Watch International Travellers) आरोग्य विभागासह महानगरपालिकेने विशेष लक्ष केंद्रीय केले आहे. तरी देखील १७५ पैकी ३० प्रवाशांचा शोध लागत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रवाशांचा शोध घेण्याची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेने (Nagpur Corporation) पोलीस विभागाकडे (Nagpur Police) दिली आहे. आता पोलिसांनी त्या ३० प्रवाशांचा शोध सुरू केला असला तरी अद्याव कुणीही मिळून आले नाही. त्यामुळे नेमकं काय सुरू आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

  • प्रवाशांना शोधण्याची जबाबदारी आता पोलिसांवर -

सोमवारी ११ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्यानंतर मंगळवारी हा आकडा वाढून १९ वर गेल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ८१ झाली आहे. हळूहळू रुग्ण संख्या वाढत असली तरी अद्याप ओमायक्रॉनने बाधित एकाही रुग्णाची नोंद नागपूर किंवा विदर्भात झालेली नाही. त्यामुळे परदेशवारी करून थेट नागपूरला येणाऱ्या आणि अन्य मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करून घेण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे येथून आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाची बाधा झालेली असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे महानगरपालिकेसह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

  • त्या ३० प्रवाशांचा शोध सुरू:-

विदेशातून नागपुरात आलेल्या १७५ पैकी ३० प्रवाशांचा शोध घेण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न केला. अनेक प्रयत्न करून सुद्धा त्यांचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने अखेर मनपाकडून त्यांना शोधण्याची जबाबदारी पोलिसांना देण्यात आली. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती कुणीही लागलेलं नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.