ETV Bharat / city

धारदार शस्त्रांनी वार करून एकाचा खून; आरोपींचा शोध सुरू - नागपूर पारडी हत्याकांड

नागपूर- भंडारा मार्गावरील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कापसी परिसर आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या भागात ट्रकसह मोठ्या वाहनांची वर्दळ असते. आज दुपारच्या सुमारास कापसी परिसरात असलेल्या एचपी पेट्रोल पंपा जवळ एक इसम मृतावस्थेत पडलेला असल्याची माहिती पारडी पोलिसांना समजली. हा मृतदेह दिलीप राऊत नामक इसमाचा असून तो गोंदिया येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.

Nagpur crime news
नागपूर
author img

By

Published : Oct 29, 2020, 5:57 PM IST

नागपूर - शहरातील पारडी पोलीस ठाण्यात हद्दीतील कापसी पुलाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपा जवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्या मृतदेहावर धारधार शस्त्रांनी वार केल्याच्या जखमा आढळून आल्याने त्याचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

मृत व्यक्ती त्या परिसरातील नसल्याने त्याची ओळख पटलेली नव्हती. मात्र, पंचनाम्यादरम्यान खिशात आढळलेल्या काही कागदपत्रांच्या आधारे हा मृतदेह दिलीप राऊत नामक व्यक्तिचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नागपूर- भंडारा मार्गावरील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कापसी परिसर आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या भागात ट्रकसह मोठ्या वाहनांची वर्दळ असते. आज दुपारच्या सुमारास कापसी परिसरात असलेल्या एचपी पेट्रोल पंपा जवळ एक इसम मृतावस्थेत पडलेला असल्याची माहिती पारडी पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली. त्या मृतदेहावर जखमा आढळून आल्या आहेत. रात्री काही आरोपींनी या इसमाचा खून केल्यानंतर पोबारा केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हा मृतदेह दिलीप राऊत नामक इसमाचा असून तो गोंदिया येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.