ETV Bharat / city

पंकजा मुंडे नाराज नसून, त्या पक्षापासून दूर जाणार नाहीत - चंद्रशेखर बावनकुळे - Chandrashekhar Bawankule on pankaja munde

पंकजा मुंडे या राज्यातील नेत्यांवर आपली नाराजी व्यक्त करत केंद्रीय नेतृत्वावर विश्वास असल्याचे बोलून दाखवले होते.

Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Jul 13, 2021, 8:25 PM IST

नागपूर - भाजप नेत्या पंकजा मुंडे या राज्यातील नेत्यांवर आपली नाराजी व्यक्त करत केंद्रीय नेतृत्वावर विश्वास असल्याचं बोलून दाखलवे होते. एका प्रकारे त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाना साधत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, पंकजा मुंडे या नाराज नाहीत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना राजीनामे देखील परत घेण्यासाठी सांगितले असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत. पंकजा मुंडे या भाजपपासून दूर जाणार नाहीत. त्यामुळे या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाल्याचे ते म्हणाले आहेत.

प्रतिनिधींनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत साधलेला संवाद
  • पंकजा मुंडे राज्य सरकारवर नाराज?

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांना मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उत आला होता. गेल्या चार दिवसांपासून पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या राजीनाम्याचे सत्र सुरू असल्याने पंकजादेखील नवीन मार्ग निवडतील असे संकेत मिळत असताना, आज स्वतः पंकजा मुंडे यांनी मी नाराज असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, ही वेळ धर्मयुद्ध लढण्याची नसल्याचे सांगत, योग्य वेळी निर्णय घेऊ असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच पदाधिकाऱ्यांना आपले राजीनामे परत घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगत राज्यातील नेतृत्वावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

  • पंकजा मुंडे नाराज नाहीत -

पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना राजीनामे परत घेण्याचे आवाहन केले आहे. आज भाषणात जरी त्यांनी कौरव-पांडव, धर्मयुद्ध या सारख्या शब्दांचा वापर केला असला तरी शेवटी कार्यकर्त्यांनी काय निर्देश दिले आहेत हे महत्वाचे आहे. पंकजा मुंडे या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या संस्कारात वाढलेल्या आहेत, त्यामुळे त्या कधीही पक्षापासून दूर जाणार नसल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले.

हेही वाचा - योग्यवेळी निर्णय घेणार, समर्थकांची समजूत काढताना पंकजा मुंडेंचे सूचक वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.