ETV Bharat / city

रामटेकच्या अंबाळा तलावात बुडाल्याने एकाचा मृत्यू, दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू - Ramtek Ambala lake

बेपत्ता झालेल्या तरुणाला शोधण्यासाठी बचाव पथकाने बराच वेळ मोहीम राबविली आहे. मात्र, त्यात अद्याप यश आलेले नाही.

बचाव पथक
बचाव पथक
author img

By

Published : Jun 9, 2021, 9:06 PM IST

नागपूर - जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यात अंबाळा तलावात दोन तरुण बुडाल्याची माहिती पुढे आली आहे. एका तरुणाचा मृतदेह मिळाला आहे. दुसऱ्या तरुणाचा शोध घेतला जात आहे. निसर्ग वाघ असे मृतदेह मिळालेल्या तरुणाचे नाव आहे. कुणाला नेवारे तलावात बुडाल्याने शोध घेतला जात आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे.

बेपत्ता झालेल्या तरुणाला शोधण्यासाठी बचाव पथकाने बराच वेळ मोहीम राबविली आहे. मात्र, त्यात अद्याप यश आलेले नाही. नागपूरात राहणारे सहा तरुण आज सकाळी फिरण्याचे उद्दिष्टाने चारचाकी वाहनाने रामटेकला गेले होते. तिथे त्यांनी अंबाळा तलाव क्षेत्रात जाण्याचे ठरविले.

हेही वाचा-'तुम्ही मोठ्या शत्रुला हरवले'; राकेश टिकैत यांच्याकडून ममतांचे कौतूक

नियम मोडून जाणे आले जीवावर

कोरोना संक्रमणामुळे सध्या अंबाळा तलावक्षेत्र पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. यामुळे या तरुणांना तिथल्या चौकीदाराने जाण्यास मज्जाव केला. यावेळी तरीही हे मित्र डोंगराच्या भागातून तलावाच्या दिशेने खाली उतरले. यात तलावाच्या पाणी पाहून मोह आवरू शकले नाही. चौघे जण पोहण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तलावात बुडायला लागले. यावेळी दोघे जण हे पाण्याबाहेर निघाले. पण दोघाना पोहता येत नसल्याने जलसमाधी मिळाली आहे. कुणाल नेवारे, आणि निसर्ग वाघ बुडाले. यामधील कुणाल वाघचा मृतदेह काढण्यात यश आले आहे. दुसऱ्याचा शोध घेतला जात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी दिली.

हेही वाचा-अहो आश्चर्यम!... महिलेने एकाच वेळी १० बाळांना जन्म दिल्याचा दावा, गिनिज बुकात नोंद होण्याची शक्यता

एनडीआरएफच्या साह्याने बेपत्ता तरुणाचा शोध-

यात घटनेची माहिती मिळताच रामटेकचे पोलीस घटनास्थळी पोहचले. बुडालेल्या तरुणांचा शोध मोहीम राबविण्यात आली. एनडीआरएफच्या साह्याने शोध घेऊनही मृतदेह न सापडल्याने दगडाच्या खणीमुळे तयार झालेल्या खड्यात खोल भागात मृतदेह अडकला असावा, असा अंदाज लावला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.