ETV Bharat / city

देहव्यापार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दलालाला पोलिसांनी दाखवला हिसका - nagpur Flesh trade news

पोलिसांनी एका भोजपुरी अभिनेत्रीसह एका मॉडेल आणि महिलेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका दलालाला अटक केली आहे.

नागपूर देहव्यापार
नागपूर देहव्यापार
author img

By

Published : Apr 10, 2021, 3:29 PM IST

Updated : Apr 10, 2021, 3:38 PM IST

नागपूर - नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णा नामक एका होटेलवर धाड टाकून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी एका भोजपुरी अभिनेत्रीसह एका मॉडेल आणि महिलेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका दलालाला अटक केली आहे.

हेही वाचा - हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली अकोल्यात देहव्यापार, तिघे ताब्यात

पैशाचे आमिष देवून करत होते प्रवृत्त

सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक रवी नागोसे यांना माहिती समजली होती, की गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्टॅण्डजवळील कृष्णा हॉटेल येथे गगन उर्फ दीपेश आणि रेहान नावाचे इसम सेक्स रॅकेट संचालित करत आहेत. या माहितीच्या आधारे एसएसबीच्या पथकाने हॉटेलमध्ये बोगस ग्राहक पाठवून मिळालेल्या माहितीची खात्री पटवली. त्यानंतर कृष्णा हॉटेलवर धाड टाकली. आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर राज्यातील मॉडलिंग करणाऱ्या तरुणींना पैशाचे आमिष देवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचा खुलासा झाला आहे. ज्या तरुणी आरोपींच्या जाळ्यात अडकतात त्यांना नामांकित हॉटेलमध्ये जागा उपलब्ध करून देहव्यापार करवून घेत आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दीपेश उर्फ गगन दिलीपभाई कानाबार (३६)ला अटक केली आहे. तर रेहान फरार आहे.

हेही वाचा - नागपुरात मसाज सेंटरच्या नावाखाली देहव्यापार; पोलिसांची कारवाई

लॉकडाऊनमुळे काम नाही, त्यामुळे...

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने तीनही तरुणींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी लॉकडाऊनमुळे काम उपलब्ध राहिलेले नाही. त्यामुळे देहविक्रीच्या व्यवसायात आल्याची कबुली दिली आहे.

Last Updated : Apr 10, 2021, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.