ETV Bharat / city

Nagpur Metro : विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाला मेट्रो प्रवासी संख्येत वाढ

author img

By

Published : Oct 7, 2022, 9:18 AM IST

विजयादशमी ( Vijayadashmi 2022 ) आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ( Dhamma Chakra Pravartan Din ) दिवशी मेट्रो प्रवासी संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात ( Increase in metro ridership ) प्रवाशांची गर्दी दिसून आली. काल दिवसभर पाऊस असल्यामुळे नागरिकांनी मेट्रोच्या प्रवासाला पसंती दर्शविली.

Increase in metro ridership
मेट्रो प्रवासी संख्येत वाढ

नागपूर : विजयादशमी ( Vijayadashmi 2022 ) आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ( Dhamma Chakra Pravartan Din ) दिवशी मेट्रो प्रवासी संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात ( Increase in metro ridership ) प्रवाशांची गर्दी दिसून आली. ८३,८७६ हजार नागरिकांनी काल मेट्रोने प्रवास केला. या पूर्वी नुकतेच २१ सप्टेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान टी२० सामना दरम्यान ८०,७९४ रायडरशिप प्रस्थापित केली होती. तर १५ ऑगस्टला ९०,७५८ प्रवासी संख्या नोंद करण्यात आली होती.

बाहेर शहरातील नागरिकांना योग्य मदत : विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्य मोठ्या प्रमाणात शहरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या निमित्य इतर शहरातील नागरिकांनी देखील मेट्रोने प्रवास केला. स्टेशन परिसरातील मेट्रो कर्मचार्यांनी बाहेर शहरातील नागरिकांना योग्य मदत करत त्यांना त्याचा सुखरूप प्रवास करण्यास मदत केली. याशिवाय या प्रवासी संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध नागरिक आढळून आले ज्यांना मेट्रोच्या प्रवासाचा लाभ झाला.

मेट्रोच्या वेळेत केली वाढ : उल्लेखनीय आहे कि, प्रवासी संख्येमध्ये वाढ बघता मेट्रो प्रशासनाने रात्री ११ वाजता पर्यंत मेट्रो सेवेमध्ये वाढ करण्यात आली होती. गेल्या काही काळापासून महा मेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. महा मेट्रो तर्फे दिलेल्या या प्रवासी सेवेचा लाभ अनेकांनी घेतला. मुख्य म्हणजे काल दिवसभर पाऊस असल्यामुळे नागरिकांनी मेट्रोच्या प्रवासाला पसंती दर्शविली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.