नागपूर - देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे लोटले आहे. आजादी का अमृत महोत्सव ( Azadi Ka Amrit Mahotsav ) म्हणून देशभर विविध पद्धतीने साजरा होत आहे. यातच विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांनी मंडळी अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम करत असतांना नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर ( Famous Chef Vishnu Manohar of Nagpur ) यांनीही वेगळ्या पद्धतीने विश्व विक्रम करत देशाप्रती असलेल प्रेम व्यक्त केली आहे. देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकरी पिकवत असलेल्या धान्य म्हणजेच तांदूळाच्या 75 वाणापासून 75 भाताच्या डिश ( 75 rice dishes from 75 varieties of rice ) बनवण्यात आल्या आहेत. यात 4 तास 45 मिनिटात हा विश्वविक्रम ( Vishnu Manohar World Record ) नोंदवला शिवाय नागपूरच्या खवय्यानी सुद्धा चव चाखत आनंद लुटलाय.
विष्णु मनोहर यांचा विश्वविक्रम - नागपूरचे प्रसिद्ध शेफ असलेले विष्णु मनोहर यांनी यापूर्वी 10 विश्वविक्रम स्वतःचा नावावर नोंदवले आहे. यातच नुकताच ट्रान्सजेंडर किन्नर यांना नौकरीची संधी आणि समाजात त्यांना सन्मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठीच त्यांच्या चविष्ट पदार्थ बनवण्याच्या कलेला प्रोत्साहन देत ट्रान्सजेंडर यांची खास व्यंजन बनवणारी स्पर्धा घेत त्यांना स्वतःच्या व्यवसायात स्थान देत नौकरीची संधी उपलब्ध करून दिली. अश्याच नवनवीन संकल्पना राबवत त्यांनी 5 हजार किलोची खिचडी, भला मोठा, पराठा बनवत आपल्या नावावर नोंदवले आहे.
बांबूशूट, गुरगट्या, पावटा नावाचाही होता भात - आज त्यांनी स्वातंत्र्य मिळालेल्या अमृत महोत्सवी वर्षात ( Jubilee Year ) आपण काही तरी वेगळे करण्याच्या हेतून अनेकांचे मदतीचे हात मिळवत स्वतःच्या उत्तम पदार्थ बनवण्याच्या कलेची फोडणी देऊन आज 75 तांदळाचे वाण घेऊन 75 डिश बनवल्या आहेत. यात आपण घरात बनवणाऱ्या 5 ते 10 पदार्थ व्यतिरिक्त माहीत नसलेल्या पदार्थांची चव चाखली. या वापरलेल्या प्रत्येक तांदळाच्या वाणाची वेगळी वैशिष्ट्य एक सुगंध आणि चव आहे. या चवीनुसार त्यांनी वेगवेगळ्या तांदळापासून हे 75 पदार्थ तयार केल्याचे शेफ विष्णु मनोहर सांगतात. बांबूशूट राईस, भरडा भात, बेसन भात, रस्सम भात, पावटाभात, बालाघाटी चावल, लोबिया चावल, कोकम भात, कैरी भात, मेथकूट भात, गुरगुट्या भात, हरीयाली पुलाव, पायसम तांदूळ दाण्याची खिचडी, ओनीअन राईस, स्मोक राईस यासह विविध अश्या 75 प्रकाराच्या रेसिपी तयार करून हा विक्रम चार तास 45 मिनिटात पूर्ण केला. 15 मिनिट पूर्वीच ठरलेल्या वेळेच्या आत त्यांनी विश्वविक्रम केला.
पाच हजार वाण असताना मोजकेच वाणाची प्रसिद्धी -शेतकरी 5 हजार पेक्षा जास्त पध्दतीचा भाताचे वाण हे देशभरात पिकवतात. पण आपल्या एचएमटी चिंनोर, शरबती,बासमती, जेएसआर, हतसदि, 1509 स्टीम राईस, 1401 स्ट्रीट राईस यासह अनेक वाण आहे. यातूनच त्यांनी त्याचा गुणधर्मामुळे हे वाण निवडत त्या रेसिपी तयात केल्या आहेत. बळीराजा इतक्या प्रकारचे वाण पिकवत असतांना आपण आपल्या खाद्य संस्कृती रोजच्या जीवनात त्याचा वापर करून तो चाखवा शेतकऱ्यांना सुद्धा त्यापासून फायदा व्हावा असा हेतू मनात ठेवून हा संकल्प पूर्ण करण्याचे काम विष्णु मनोहर यांनी केले. यामध्ये त्यांना आर्थिक गणित जुळवताना एमडी ट्रॅव्हल्स, यासह आकार फिल्म्स, अनेकांनी आर्थिक भार उचलत या उपक्रमाला हात भार लावला असल्याचे विष्णु मनोहर यांनी ईटीव्हीशी बोलतांना सांगितले.
खवय्यानी लुटला भाताचा वेगवेगळ्या रेसिपीचा आनंद - यावेळी खवव्ये म्हणून आलेल्या गृहिणी मालती आठले यांनी बोलताना यापूर्वी कधी एवढे नाव ऐकले नव्हते. पण या निमित्याने चार ते पाच प्रकारचे भाताची चव चाखली त्या चवीचे कौतुक केले. तसेच डॉ. आनंद ढोबळे यांनीही या शेतकऱ्यांना प्रति केलेल्या उपक्रम तसेच यापूर्वीही केलेल्या उपक्रमांचे कौतुक करत विष्णु मनोहर यांच्या सामाजिक हेतू जपत असल्याचे म्हणत विश्व विक्रमाला शुभेच्छा ईटीव्हीशी बोलताना दिल्यात.
शेतकऱ्यांचा केला सन्मान - यावेळी 75 वा भात शेतकरी यांनी विष्णू अमृत भात या वाणापासून पदार्थ तयार करून पुलाव तयार केला होता. जिल्हाधिकारी विमला आर यांनी स्वतः तो भात विष्णु मनोहर याना भरवत शुभेच्छा दिल्यात. तसेच खादी आयोगाचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्तां यांनी खादीचा तीन रंगाचा दुप्पटा देऊन सन्मान केला. तसेच यावेळी तांदूळ उत्पादक शेतकरी दाम्पत्याचा साडी चोडी कापड देऊन मानसन्मान करण्यात आला. प्रत्येक भात जवळपास ५ किलो तयार करत म्हणजेच एकूण ३७५ किलो भात तयार केला. तसेच यातील काही भाग हा विशिष्ट मुलांच्या शाळा, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, अंधवि़द्यालय इत्यादी ठिकाणी वितरीत केला जाणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.