ETV Bharat / city

नागपुरात पीपीई किट फेकले स्मशानात; मनपाने बजावली कारणे दाखवा नोटीस - नागपूर कोरोना बातम्या

कोरोनाचा संसर्ग रुग्णांपासून इतरांना होऊ नये, यासाठी पीपीई किट वापरले जातात. मृत पॉझिटिव्ह रुग्णांच्या अत्यंसंस्कारा दरम्यान हे किट नष्ट करायचे असतात. परंतु नागपुरातील प्रमुख तीन झोनमध्ये वापरलेले पीपीई किट स्मोशानात फेकल्याचे दिसून आले. या प्रकरणाची मनपा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

नागपूर महानगर पालिका
नागपूर महानगर पालिका
author img

By

Published : Sep 5, 2020, 4:20 PM IST

नागपूर - शहरातील मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी वापरण्यात आलेले पीपीई किट स्मशानातच फेकण्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याप्रकरणाची दखल घेत, महानगरपालिकेकडून संबंधित स्वच्छता झोनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात अधिकाऱ्यांना प्रत्येकी १००० रुपये दंड आणि कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. शहरातील तीन झोनमध्ये ही स्थिती आढळल्याने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी ही कारवाई केली.

नागपूर स्मशानभूमी

कोरोनाचा संसर्ग रुग्णांपासून इतरांना होऊ नये, यासाठी पीपीई किट वापरले जातात. मृत पॉझिटिव्ह रुग्णांच्या अत्यंसंस्कारा दरम्यान हे किट नष्ट करायचे असतात. परंतु नागपुरातील प्रमुख तीन झोनमध्ये वापरलेले पीपीई किट स्मशानात फेकल्याचे दिसून आले. या प्रकरणाची मनपा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे लक्ष्मीनगर झोन, नेहरूनगर झोन आणि गांधीबाग झोन या झोनमधील अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय प्रत्येकी १००० रुपये दंडही मनपाकडून ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही आयुक्त राधाकृष्णन बी यांनी बजावली आहे. २४ तासांच्या आत याप्रकरणी स्पष्टीकरण दिले नाही, तर मनपा प्रशासनाकडून प्रशासकीय कारवाई सुद्धा केली जाणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - दिनविशेष : कोरोनाकाळातील 'शिक्षक दिन'

शहरात वाढत असलेली रूग्णसंख्या पाहता जबाबदार अधिकाऱ्यांकडून असे प्रकार घडत असल्याने मनपा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हे उपस्थित केल्या जात आहेत. शिवाय मनपा प्रशासनाकडून पीपीई किट मृत व्यक्तीच्या अत्यंसंस्काराबाबत मार्गदर्शन तत्वे असूनही त्याचे पालन का केले गेले नाही? असे सवालही उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाकडून संबंधित प्रत्येक झोनमधील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे की, शववाहिनीवर मृतदेह उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घातलेल्या पीपीई किटची विल्हेवाट तत्काळ करावी. महानगरपालिकेकडून दिलेल्या निर्देशानुसारच या किट ची विल्हेवाट लावण्यात यावी. ही किट दहनघाटावर किंवा इतरत्र कोठेही टाकू नये, अशा सूचनाही यावेळी महानगरपालिका प्रशासनाकडून घनकचरा व्यवस्थापन व संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. शिवाय या पुढे असे प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्याची ताकीदही महानगरपालिकेने दिली आहे.

हेही वाचा - शिक्षक दिन विशेष : अवघ्या २२ वर्षांचा तरुण मेंढपाळांच्या मुलांना देतोय व्यवहार ज्ञानाचे धडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.