ETV Bharat / city

देशातील पहिला एलएनजी रिफिलिंग स्टेशन विदर्भात सुरू; केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते झाले उद्घाटन - एलएनजी रिफिलिंग स्टेशन

आयुर्वेदिक क्षेत्रानंतर बैद्यनाथ कंपनीच्या वतीने देशातील पहिले एलएनजी स्टेशन हे उमरेडरोडवरील विहिरगाव परिसरात सुरू करण्यात आले आहे. ग्रीन एनर्जी प्रदूषण मुक्त आणि डिझेलच्या तुलनेत स्वस्त इंधन आहे. त्यामुळे भविष्यात ट्रान्सपोर्ट क्षेत्रात क्रांतिकारक बदलाची ही नांदी असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी व्यक्त केले. काही देशात फ्लेक्स इंजिनच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल किंवा बायोगॅसच्या उपयोग केला जात आहे.

देशातील पहिला एलएनजी रिफिलिंग स्टेशन विदर्भात सुरू

author img

By

Published : Jul 12, 2021, 7:49 AM IST

नागपूर- डिझेलला पर्याय आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणनाऱ्या एलएनजी म्हणजेच लिक्विड नॅचरल गॅस हे इंधनला पर्याय म्हणून वापरता येणार आहे. याच रिफिलिंग स्टेशनचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते करण्यात आले. आयुर्वेदिक क्षेत्रानंतर बैद्यनाथ कंपनीच्या वतीने देशातील पहिले एलएनजी स्टेशन हे उमरेडरोडवरील विहिरगाव परिसरात सुरू करण्यात आले आहे. ग्रीन एनर्जी प्रदूषण मुक्त आणि डिझेलच्या तुलनेत स्वस्त इंधन आहे. त्यामुळे भविष्यात ट्रान्सपोर्ट क्षेत्रात क्रांतिकारक बदलाची ही नांदी असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी व्यक्त केले. काही देशात फ्लेक्स इंजिनच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल किंवा बायोगॅसच्या उपयोग केला जात आहे. देशातही अशा पद्धतीचे इंजिन ऑटोमोबाईल कंपन्यांनी निर्माण करावे, यांसाठीचा निर्णय विचाराधीन असल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते झाले उदघाटन

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी पेट्रोल आयात करण्याऐवजी बायोगॅसचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या स्वस्त दरात उपलब्ध इंधनाच्या वापरासह प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आज मोठ्या प्रमाणात म्हणजेच 8 लाख कोटी रुपये आपण पेट्रोलियम म्हणजे क्रूड ऑईल आयात करण्यासाठी करत आहोत. अर्थव्यवस्थेवरचा हा मोठा भार आहे, त्याच बरोबर या इंधनाच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यामुळे यासाठी एक योजना आणून याला पर्याय देण्याचे काम केले जात आहे. ज्यामध्ये स्वस्त इंधन आणि प्रदूषण मुक्तीसाठी इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायोसीएणजी, इलेक्ट्रीक, एलनजी आणि हायड्रोजन फ्युलला प्रोत्साहन दिले जात असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
देशातील पहिला एलएनजी रिफिलिंग स्टेशन विदर्भात सुरू
हा आनंदाचा क्षण आहे-

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचा मंत्री म्हणून सातत्याने इंधनाला पर्याय मिळवण्यासाठी मी काम करत आहे. यात पहिला पर्याय म्हणून इथेनॉल आहे. आज मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मित होत असून उसापासून त्याची निर्मित केली जात आहे. यात आता धान, कोल आदीपासून सुद्धा इथेनॉल बनवण्यासाठी परवानगी दिली आहे. हा एक प्रयत्न आहे की ज्यामध्ये शेती क्षेत्राला एनर्जी आणि पावर सेक्टरकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या यातील काही गोष्टीची सुरुवात होत असल्याने माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

एलएनजी रिफिलिंग स्टेशन
एलएनजी ट्रक
काय आहे एलएनजी त्याचे फायदे....

एलएनजी शुद्ध इंधन असून हे मायनस 260 डिग्रीवर वाहनांच्या इंधन टाकीत टाकून त्याचा वापर केला जातो. यासाठी वाहनात बदलकरून किट लावले जाणार आहे. ज्याची सध्याची किंमत हे 9 लाखाच्या घरात आहे. यात वर्षाला ट्रान्सपोर्ट क्षेत्रात धावणारे ट्रक हे साधारण 98 हजार किलोमीटर धावतात. यामुळे पेट्रोलच्या दराच्या तुलनेत या किटचे पैसे हे 80 हजार किलोमीटर चालल्यावर साधारण 8 ते 9 महिन्यात निघून जाईल, असा दावा करण्यात आला आहे. यात एकदा 180 किलो लिक्विड गॅस भरला जातो. त्यानंतर साधारण 700 ते 800 किलोमीटर अंतर ट्रक धावू शकतो, इतकी या ट्रायोजेनीक टँकची क्षमता आहे. यामुळे यात डिझेलच्या तुलनेत 2 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमता असल्याचेही बी एलएनजीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रणव शर्मा यावेळी प्रासार माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.