ETV Bharat / city

Legislative Council Election : निवडणुकीच्या आदल्या रात्री कॉंग्रेसने बदलला उमेदवार; 'या' उमेदवाराला पाठिंबा - विधानपरिषदेच्या नागपूर जागेची निवडणूक

गेल्या दोन दिवसांपासून ज्या गोष्टीची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्या चर्चेला अखेर विराम मिळालेला असून भाजपामधून आयात केलेले काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार (MVA Candidate For Legislative Council Election) रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे मतदानाला काही तास शिल्लक असताना ऐन वेळेवर कॉंग्रेसने अपक्ष उमेदवार असलेल्या मंगेश देशमुख (Independant Candidate Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Legislative Council election
Legislative Council election
author img

By

Published : Dec 9, 2021, 8:20 PM IST

Updated : Dec 9, 2021, 9:12 PM IST

नागपूर - गेल्या दोन दिवसांपासून ज्या गोष्टीची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्या चर्चेला अखेर विराम मिळालेला असून भाजपामधून आयात केलेले काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार (MVA Candidate For Legislative Council Election) रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे मतदानाला काही तास शिल्लक असताना ऐन वेळेवर कॉंग्रेसने अपक्ष उमेदवार असलेल्या मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress President Nana Patole) यांनी हा निर्णय घेतला आहे. ऐनवेळी घडलेल्या घटनेमुळे काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला 'पंजा' ऐवजी अपक्ष उमेदवाराच्या चिन्हाससमोर मतदान करण्याची वेळ आली आहे.

व्हिडीओ

नाना पटोलेंच्या निर्देशानुसार निर्णय -

काँग्रेसचे प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष यांनी अधिकृतरीत्या पत्र काढून अशा पद्धतीची घोषणा केल्याने निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला शेवटचे काही तास शिल्लक असताना अचानक झालेला हा फेरबदल राजकीय वर्तुळात मोठा भूकंप म्हटला तरी वावगे ठरणार नाही, अशीच काहीशी घटना घडली आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसात हे पत्र काढण्यात आले असून हे पत्र काँग्रेसचे शहर काँग्रेस कमिटीचे आणि ग्रामीणचे अध्यक्ष यांना पाठवण्यात आले आहे.

कॉंग्रेसच्या बैठकीत मंगेश देशमुख होते उपस्थित -

निवडणुका होत असतात, पण अशा पद्धतीने काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला ऐनवेळी मतदान होण्याच्या काही तासांपूर्वी जर उमेदवार असमर्थता दाखवून बदलावा लागत असेल, तर याला नामुष्की म्हणावी की काय अशीच चर्चा रंगत आहे. पण काँग्रेसला आधीकृतपणे उमेदवार हा बद्दलवावा लागला, यातही काही तर राजकीय खेळी नक्कीच आहे. कारण काँग्रेसला ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नव्हती, हे स्पष्ट आहे. उमेदवाराची घोषणा अधिकृतरित्या जरी आज जाहीर झाली असली, तरी काँग्रेस पक्षाची बुधवारी झालेल्या बैठकीत मंगेश देशमुख हे उपस्थित असल्याचे समोर आले होते. या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे स्वतः उपस्थित होते. तसेच त्यांच्यासोबत काही नगरसेवक सुद्धा उपस्थित होते. पण यावेळी अधिकृत उमेदवार छोटू भोयर हे मात्र कुठे दिसून आले नसताना अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात कालपासूनच खलबते सुरू होती.

हेही वाचा - मुंबई विमानतळावर २४७ कोटी रुपयांचे ३५ किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त

Last Updated : Dec 9, 2021, 9:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.