नागपूर - नागपूरच्या आयटी पार्क परिसरापासून जवळच असलेल्या गायत्री नगरमध्ये एकाला सकाळी पावने दहा वाजताच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे आढळून आले. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बिबट्या सुरुवातीला नरेंद्र चाकोले नावाच्या व्यक्तीला दिसून आला.
'बाथरूममध्ये दिसला बिबट्या'
नागपुरातील नरेंद्र चाकोले हे गायत्री नगर (आयटी पार्क) परिसरात राहतात. ते सकाळी कुलरमध्ये पाणी भरण्यासाठी बाथरूमचा नळ सुरू करण्यासाठी गेले. यावेळी त्यांना सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास बाथरूममध्ये बिबट्या दिसला. ते घाबरले असताना ओरडले आणि तेवढ्यात बिबट्याने पळ काढला. यावेळी मात्र त्यांच्या पायाला नख लागले असल्याचे ते सांगतात. त्यानंतर पोलीस आणि वन विभागाला माहिती देण्यात आली. या परिसरात वन विभागाकडून सर्चिंग मोहीम राबवली जात आहे. शहरातील माध्यभागी असलेल्या परिसरात हा बिबट दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्च मोहीम सुरू
या परिसरात किशोर जगताप यांच्या घरावरून जेव्हा बिबट्या उडी मारून गेला. त्यावेळी त्यांचा बाथरूमच्या वर बिबट्याच्या पगमार्क उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी वन विभागाचे कर्मचारी सर्चिंगला पोहचले असता त्यांनीही हे पगमार्क असल्याचे प्राथमिकरित्या तरी दिसून येत असल्याचा अंदाज व्यक्त केला. सध्या वन विभागाकडून या घराला लागून असलेला राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण प्रतिष्ठानचा परिसरात शोध मोहीमसह आजू बाजूचा भाग तपासला जात आहे. अद्याप बिबट्या त्यानंतर कोणाला दिसून आला नाही. यामुळे या परीसरात सर्वत्र सर्च मोहीम राबवली जात आहे.
हेही वाचा - राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढणार ?, काही ठिकाणी शिथिलता