नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी दीक्षाभूमी येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन भन्ते नागार्जुन सुरइ ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते. या सेंटरमध्ये 15 ऑक्सिजन बेड आणि 15 विलगीकरण बेडची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.
![दीक्षाभूमी स्मारक समितीचा उपक्रम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-dikshabhumi-covid-center-pkg-7204321_09052021234103_0905f_1620583863_431.jpg)
आर्थिक अडचणींतील रुग्णांसाठी दिलासादायक-
नागपुरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने उपचारासाठी आणि विलगीकरणासाठी असलेल्या सर्व कोविड सेंटरमध्ये देखील रुग्णांना जागा उपलब्ध होत नसल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने आर्थिक अडचणीत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना या सेंटरचा मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती कोविड केअर सेंटरचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली.
![दीक्षाभूमी स्मारक समितीचा उपक्रम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-dikshabhumi-covid-center-pkg-7204321_09052021234103_0905f_1620583863_149.jpg)