ETV Bharat / city

Jayant Patil In Nagpur : विधानपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही 'महाविकास आघाडी' म्हणून सोबत असू - जयंत पाटील

विधान परिषदेच्या उमेदवाराबद्दल राष्ट्रवादीची भूमिका स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केलेली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार (MVA Candidate For Legislative Assembly Election) सोबत असणार आहे. जो काही निर्णय महाविकास आघाडीच्यावतीने घेतला जाईल, त्यासोबत आम्ही असू अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी दिली आहे.

Jayant Patil In Nagpur
Jayant Patil In Nagpur
author img

By

Published : Dec 9, 2021, 5:27 PM IST

नागपूर - विधान परिषदेच्या उमेदवाराबद्दल राष्ट्रवादीची भूमिका स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केलेली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार (MVA Candidate For Legislative Assembly Election) सोबत असणार आहे. जो काही निर्णय महाविकास आघाडीच्यावतीने घेतला जाईल, त्यासोबत आम्ही असू अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी दिली आहे. ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नागपूर विमानतळावर (Jayant Patil Speak To Media At Nagpur Airport) माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी स्थानिक नेते काँग्रेससोबत नाराज आहे, हे मान्य करत आम्ही आघाडी म्हणून काँग्रेसच्या उमेदवारांसोबत असू, असेही स्पष्ट केले.

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

'महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा असणार' -

नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार असलेले रविंद्र उर्फ छोटू भोयर (Ravindra Bhoyar will Be Candidate For MVA) हे बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. यात विशेष म्हणजे बुधवारी नागपूरच्या एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसच्या एका गटांचे नगरसेवक उपस्थित होते. याच ठिकाणी अपक्ष असलेला मंगेश देशमुख (Independant Candidate Mangesh Deshmukh) हा उमेदवार भेटीला येतो. पण काँग्रेसचा अधिकृत उमेदवार तिथे उपस्थित नाही. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यावर काँग्रेसचा उमेदवार बदलणार आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना केला असता, काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला आहे. त्याला आमचा पाठिंबा देण्याची भूमिका असणार आहे. जे निर्णय स्थानिक नेते घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे म्हणत त्यांनी कुठेतरी स्थानिक नेत्यांवर विधानपरिषदेत निवडणुकीत कोणासोबत जायचे ही जबाबदारी सोपवली असल्याचे भाष्य केले.

'देशाच्या सर्वोच्च सैनिकाचा मृत्य हादरा आहे' -

हेलिकॉप्टर अपघात हा दुर्दैवी होता. यात देशातील पहिले सिडीएस असलेले बिपीन रावत यांचा मृत्यू (CDS Bipin Rawat Death In Helicopter Crash) झाला. ही घटना देशाला हादरा बसणारी असून अत्यंत दुःखद आहे. पण या घटनेची योग्य ती चौकशी होईल आणि योग्य ती घटना बाहेर येईल, अशीच अपेक्षा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

'केंद्रीय एजन्सीने कारण नसताना अडकून ठेवले आहे' -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh In ED Custody) यांना कुठलेही ठोस कारण नसताना केंद्रीय एजन्सीकडून डांबून ठेवले आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा - Bipin Rawat chopper crash : बिपीन रावत यांचा प्रत्येक क्षण देशासाठी होता - डॉ. माधुरी कानिटकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.